शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बेरोजगार तरुणांचा अशोक लेलँड कारखान्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:54 PM

अशोक लेलँड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना समाविष्ठ करुन घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे महासचिव शशीकांत भोयर यांच्या नेतृत्वात बेरोजगार युवकांनी अशोक लेलॅण्ड कारखान्यावर शनिवारला दुपारी मोर्चा काढला.

ठळक मुद्देभिक नको हक्क हवा : मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा बसपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : अशोक लेलँड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना समाविष्ठ करुन घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे महासचिव शशीकांत भोयर यांच्या नेतृत्वात बेरोजगार युवकांनी अशोक लेलॅण्ड कारखान्यावर शनिवारला दुपारी मोर्चा काढला.सकाळी दहा वाजता मोर्चाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयापासून करण्यात आली. मागण्या हक्काच्या, भीक नको हक्क हवा, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. सन १९८२ - ८३ मध्ये भंडारा जिल्ह्यातील गडेगाव एमआयडीसीसाठी राजेगाव परिसरातील जमीन हस्तांतरीत करण्यात आली होती. त्या मोबदल्यात स्थानिक जमीन मालकांना मोबदला स्वरुपात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला एमआयडीसी प्रकल्पामध्ये नोकरी लावून देण्याच्या अटीवर स्थानिकांची शेतजमीन घेण्यात आली होती. परंतु स्थानिक लोकांना नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आले नाही.यादरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमिनी संपादीत सर्व जमीनधारकांना नोकरी मिळण्यासंदर्भात पत्रव्यवहार करून पाठविण्यात आले होते. परंतु त्याची दखल राजेगाव एमआयडीसी येथील स्थापन करण्यात आलेल्या कंपन्यांनी घेतली नाही. त्यामध्ये अशोक लेलँड कंपनी ही मोठ्या प्रकारातील कंपनी असून याठिकाणी अजूनपर्यंत राजेगाव या गावातील स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात आले नाही.अशोक लेलँड कंपनी लिमिटेड या कंपनीच्या हद्दीत राजेगाव येथील २६ एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याने त्या ठिकाणी पक्के सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानुसार राजेगाव गावाचा मिळणारा कर मागील सन १९८२-८३ पासून मिळाला नाही. त्यामुळे गावाचा विकास खुंटला, गावात कोणतेही प्रकारचे विकासकामे होऊ शकली नाहीत. या २६ एकर जमिनीचा कर अंदाजे दोन कोटी ४५ लाख ७० हजार रुपये ग्रामपंचायतीला कर स्वरुपात मिळाले असते. परंतु कंपनीच्या कर चुकवेगिरीमुळे कंपनीला माहिती देऊनही उत्तर मिळाले नाही. १३ आॅगस्ट १९९६ रोजी कर मागणीसंदर्भात नोटीस वा सूचनापत्र देऊनही कंपनी प्रशासनाने दखल घेतली नाही. आजपर्यंत कंपनीने अतिक्रमण केलेल्या जागेवर रितसर सिमेंटचे पक्के बांधकाम करून या जागेचा कर अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. सदर जमिनीचा कर ३० दिवसाच्या आत भरण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. सदर २६ एकर जागेची मोजणी ३ एप्रिल २०१८ रोजी होणार आहे. राजेगाव एमआयडीसी येथील बेरोजगारांना अशोक लेलँड कंपनीमध्ये नोकरी देऊन समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन व्यवस्थापक अरविंद बोरडकर यांनी स्वीकारले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड हे ताफ्याासह पोलीस बंदोबस्तात होते. आंदोलकांसोबत चर्चा करण्याची तयारी कंपनी प्रशासनाने घेतल्याने व वेळीच आंदोलकांची तीव्रता लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा करण्याचे आवाहन केले. कारखाना व्यवस्थापन व आंदोलकांमध्ये अडीच तास चर्चा झाली. कंपनी प्रशासनाने तोडगा काढू व ग्रामपंचायतचे थकीत कर भरण्याचे आश्वासन दिले.यावेळी बसपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर, शरद वासनिक, बंडू मलोडे, आनंदराव गंथाडे, महासचिव शशीकांत भोयर, कुंजन शेंडे, राजेगावच्या सरपंचा अनिता शेंडे, शिलवंत रंगारी, निलेश नागदेवे, हितेश झंझाड, मार्कंड थोटे, अलोक शेंडे, वसंता वासनिक, मनोहर सार्वे, शालीक गंथाडे, अशोक शेंडे, अमरदीप गणवीर, देवांगणा खोब्रागडे, सागरता शेंडे, अनुरता वासनिक, सविता रामटेके यांच्यासह शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते.