भंडारा : आधुनिक जीवनशैलीत दिवसेंगणिक सोशल मीडियाचा वापर आणि प्रभाव वाढत आहे. परंतु सकारात्मक उपयोगासोबतच त्याचा गैरवापर करण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोशल मीडियाचा गैरवापर अधिक झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये सोशल मीडियाच्या गैरवापरासंदर्भात ३५ गुन्ह्यांची तर यावर्षात ४० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
व्हॉटअप, फेसबुक यासह अन्य सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कोट्यवधींच्या घरात ग्राहकांची संख्या असून त्याचा गैरवापरही होत असल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून दिसून येते. मात्र अनेक गुन्ह्यांची किंवा घटनेची नोंद सामाजिक दबाव किंवा बदनामीच्या भीतीपोटी होत नाही. सण २०१९ मध्ये एकूण सोशल मीडियाच्या गैरवापरासंदर्भात ३५ पैकी १२ गुन्हे महिलांच्या बाबतीत होते. यात सोशल मीडियाच्या माध्यमातून दमदाटी करणे, अश्लिल संभाषण, संदेश पाठविणे, छायाचित्र प्रसारीत करणे आदी बाबींचा समावेश होता. या एकूण घटनांपैकी ११ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. यावर्षी जानेवारी ते १५ डिसेंबरपर्यंत ४० घटनांची नोंद केली असून त्यापैकी नऊ गुन्हे महिलांच्या बाबतीत होते. सात गुन्हे उघड झाले आहेत.
बॉक्स
गुन्हा दाखल केल्यानंतर तांत्रिक बाबींचा आधार घेवून आरोपींचा शोध घेतला जातो. यात पथक निर्मिती करून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जाते. पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन कारवाई केली जात असते.
बॉक्स
जिल्ह्यात यावर्षी ४० गुन्ह्यांची नोंद झाली असली तरी सातही तालुक्यात याचे प्रमाण समप्रमाणात असल्याचे दिसून येते. अपुरे मनुष्यबळ व कधी तांत्रिक कारणांच्या अभावी कारवाईला विलंब होतो. मात्र भंडारा जिल्हा पोलीस दलातील सायबर ब्राँचच्या चमूने बहुतांश कारवाई चपळतेने करून गुन्ह्यांचा उलगडा केला आहे.
३५
४०
जानेवारी २
फेब्रुवारी ३
मार्च ५
एप्रिल ४
मे ३
जून ५
जुलै ४
ऑगस्ट ३
सप्टेंबर ५
ऑक्टोंबर २
नोव्हेंबर ३
डिसेंबर १