बक्षिसांचा वर्षाव : नि:शुल्क प्रवेश, योग्य पालक कसे व्हावे? मार्गदर्शन ९ रोजीभंडारा : लोकमत बाल विकास मंच व द लाडर््स पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ८ एप्रिल रोजी येथील सिंधी कॉलोनी परिसरातील द लॉर्डस् पब्लिक स्कूल, न्यू कॅम्पस भ्रृशुंड गणेश मंदिर मार्गावर येथे एका पेक्षा एक नृत्य व लिटिल स्टार छोटे कलाकार अभिनय स्पर्धा व ९ एप्रिल रोजी योग्य पालक कसे व्हाल? परिसंवाद व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बाल विकास मंच सदस्य, विद्यार्थी, सखी, बालक व लोकमत वाचक नि:शुल्क सहभागी होऊ शकतील.८ एप्रिल रोजी अनुक्रम लिटील स्टार, छोटे कलाकार स्पर्धेत वयोगट २ ते ५ वर्षेचे स्पर्धक आपल्या अभिनयाचे सादरीकरण करतील. वयोगट ६ ते १० व ११ ते १५ मधून एकल नृत्य व वयोगट ६ ते १५ मधून समुह नृत्य स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेच्या वेळी ५.३० पर्यंत स्पर्धकांनी कार्यक्रमास्थळी पूर्ण तयारीनिशी नोंदणी करायची आहे. एकल नृत्याकरिता ३ मिनिटे व समूह नृत्याकरिता ५ मिनिटे गीत पेन ड्राइव्ह व मोबाईल मध्ये घेऊन यावे. वेळेत नोंदणी करणाऱ्यांनाच स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतापासून योग्य पालक कसे व्हाल? परिसंवादात विषयतज्ज्ञ सतीश फळके मार्गदर्शन करतील व सखी मंच, बाल विकास मंच स्पर्धेतील विजेते व विविध नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल.स्पर्धा व कार्यक्रमाच्या अधिक माहितीकरीता बालविकास मंच जिल्हा संयोजक ललित घाटबांधे ९०९६०१७६७७ सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार ८०८७१६२३५२ किंवा युवा प्रतिनिधी स्नेहा वरकडे ८००७०८२२३७ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)जिल्हास्तरीय लकी ड्रॉभंडारा : ९ एप्रिल रोजी कार्यक्रमास्थळी बाल विकास मंचचा जिल्हास्तरीय लकी ड्रा काढण्यात येणार आहे. सदस्यांना कार्यक्रमात येतांना सदस्य नोंदणी कार्ड आणने अनिवार्य राहील. लकी ड्रामध्ये होमथिएटर, इन्डेकशन, ज्युसर, हॉटपॉट, व्हेज कटर, सिलेंडर ट्राली जिंकण्याची संधी मिळेल. लकी ड्रा लागलेला सदस्य उपस्थित नसल्यास पुढील सदस्यांना संधी देण्यात येईल. अधिक माहितीकरिता कार्यक्रम संयोजक ललित घाटबांधे यांच्याशी संपर्क साधावा.
‘एकापेक्षा एक’ नृत्य व अभिनव स्पर्धा आज
By admin | Published: April 08, 2017 12:30 AM