इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला असला तरी रबी पिकाच्या पेरणीत उद्दिष्टापैकी अधिक पीक पेरणी झाल्याचे दिसून येत आहे. ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे.भंडारा जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. खरीप हंगामानंतर शेतकरी रबी पिकाकडे वळतो. यात रब्बी पिकांतर्गत गहू यासह इतर कडधान्य अंतर्गत हरभरा, लाख, लाखोळी, पोपट, वाटाणा, उडीद, मुग, मसूर, चवळी, मोट व अन्य धान्याचा समावेश आहे. यासह गळीतधान्यांतर्गत जवस सूर्यफुल, मोहरी, तीळ, एरंडी (सोयाबीन) आदी पीके घेतली जातात. तसेच भाजीपाला पीके घेण्यात येतात.जिल्ह्यात सातही तालुक्यांमध्ये गहू पिकाची रबी पिकांतर्गत ९ हजार ७३८ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. याशिवाय कडधान्याची ३१ हजार ४३८ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली असून गळीत धान्यांतर्गत १५६१ हेक्टरमध्ये पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धान पीक घेण्यास मनाई करण्यात आली आहे. रबी पीक पेरणीचे ४५ हजार हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दीष्ट असले तरी यावर्षी ते त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २ हजार ४०२ हेक्टराने वाढ झालेली आहे. दुसरीकडे बागायती शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमीच आहे. परिणामी योजना असुनही त्याचा लाभ घेतला जात नसल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.२९६३ हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादनरबी हंगामात भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी हव्या त्या प्रमाणात लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. २९६३ हेक्टरमध्ये भाजीपाला पिकाची लागवड केली असून उत्पादनाअभावी भाजीपाल्याची दुसºया जिल्ह्यातून आयात करावी लागत आहे. परिणामी ऐन हंगामातही भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडतात. रबी पीक पेरणीचे ४५ हजार हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दीष्ट होते, हे येथे उल्लेखनीय.अशी आहे तालुकानिहाय रबीची पेरणीजिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील एकूण रबी पिकाखाली क्षेत्रांतर्गत भंडारा तालुक्यात एकुण सर्वसाधारण क्षेत्रापैकी पेरणी क्षेत्र ६१९३ हेक्टर, मोहाडी ३१४४ हेक्टर, तुमसर ५५७१ हेक्टर, पवनी १३८६४ हेक्टर, साकोली ३७७० हेक्टर, लाखनी ६३२९ हेक्टर तर लाखांदूर तालुक्यात ८८३० हेक्टरमधे रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र कडधान्याच्या पेरणीत वाढ दिसून येते.
रबी पिकाची पेरणी उद्दिष्टापेक्षा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:55 PM
जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला असला तरी रबी पिकाच्या पेरणीत उद्दिष्टापैकी अधिक पीक पेरणी झाल्याचे दिसून येत आहे. ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे४७ हजार हेक्टर क्षेत्र वाढले : उन्हाळी पिकांवर संकट कायम, कमी पावसाचा शेतकऱ्यांना फटका