पक्षी होत आहेत लुप्त : सिमेंटच्या जंगलाचे सुशोभीकरणपुरूषोत्तम डोमळे । लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : एकेकाळी जिल्ह्यातील दाट आणि प्राणीसंपदा असलेली विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली जंगले बहुतांश उजाड झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातही मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची मौल्यवान जातीची झाडे होती. मात्र अस्मानी संकटामुळे सतत होणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि कुटुंबाचा निर्वाह चालवण्यासाठी कंत्राटदाराना शेतात असलेली झाडे विकू लागला. त्यामुळे एकेकाळी हिरवीगार दिसणारी शेती आज वृक्षाविना उजाड होताना दिसून येत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक असलेली वनसंपदा नष्ठ केली जात आहे. वृक्षतोडीचा मानवी जिवनावर जसा परिणाम होत आहे तसाच परिणाम पशुपक्ष्यावरही झाला आहे. या मुख्य कारणामुळे निसर्गाने मुक्त वावरणाऱ्या पक्ष्याच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत तर काही प्रजाती कायमच्या लुप्त होत चालल्या आहेत.अन्न, वस्त्र व निवाऱ्यासोबत मानवतासह प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुद्ध वातावरणाची गरज आहे. शुद्ध वातावरण निर्मिती वृक्षामुळेच होते. वातावरणात शुद्धता मिळत नसल्याने निसर्गाच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या पक्षांच्या संख्येत घट होत चाललेली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे लाकूड कंत्राटदारावर मेहरनजर राखण्यात येत असल्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे वृक्ष हाच आधार असलेली पक्षी सहजच लुप्त होत आहेत. काही शेतात अल्पप्रमाणात वृक्ष उरलेली आहेत. त्यांनाही वाचविण्याचे प्रयत्न होत नाही. नव्याने लावलेली वृक्ष लवकर मोठे होत नाही. जनतेमध्ये नवीन झाडे लावून झाडे जगविण्याचा अभाव आहे. याच कारणामुळे निसर्गाचा समतोल निवडला आहे. पुर्वी लोकसंख्या फार होती. गावात तसेच शेतात मोठमोठी वृक्ष होती. पुर्वी लोक वृक्ष पुजन करायचे. जागोजागी विविध वृक्षांची लागवड होत होती. याच झाडावर पक्ष्यांचे वास्तव्य असायचे मात्र सद्यस्थितीत वृक्षांची संख्या कमी होत चालली आहे. सिमेंटची जंगले कमी होवू लागली आहे. या सिमेंटच्या जंगलाना सुशोभित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. एकीकडे वृक्षतोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे तर दुसरीकडे समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण वाढल्यामुळे विविध प्रकारच्या प्रजातीचे पक्ष्यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते, शासन प्रशासनामार्फत गाजावाजा करून वृक्षरोपण केले जाते. कोट्यावधी रूपये खर्च केले जातात. वर्तमानपत्रात फोटो छापून प्रसिद्धी दिली जाते. नंतर त्याकडे कुणीच ढुंकूनही पाहत नाही. वृक्षरोपण केल्यानंतर झाडे जगविण्याची हमी प्रत्येक नागरिकांनी तसेच संबंधित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे. दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात मात्र जिवंत झाडे किती आहेत याचा आढावा कोणताच अधिकारी घेत नाही. हे योग्य नाही. सध्या लाकडी वस्तु न वापरण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र आज सर्वत्र फर्निचर मार्ट गल्लोगल्लीत पाहावयाच मिळत आहेत.
शेतातील वृक्षांची सर्रास कत्तल
By admin | Published: June 05, 2017 12:18 AM