उसर्रा (ता. मोहाडी) : अकरा दिवसांची ती चिमुकली. बाळाला जन्म दिला; परंतु तिला मन भरून पाहिलेच नाही. कन्येला जन्म दिला. तिला घरी घेऊन जाईन, तिला मायेची उब देईन, असे सोनेरी स्वप्न पाहणाऱ्या आईच्या वाट्याला दु:ख आले. आगीत होरपळून आपल्या चिमुरडीचा जीव गेला, हे वृत्त तिला कळतात तिने हंबरडा फोडला. हे असं होऊ शकत नाही, असे ती वारंवार सांगत होती. माझ्या मुलीला परत आणून द्या, असा हंबरडा फोडताच उपस्थित सर्वच नि:शब्द झाले. सुकेशनी धरमपाल आग्रे (रा. उसर्रा) असे या मातेचे नाव आहे. शनिवारची पहाट आग्रे कुटुंबीयांसाठी वैररात्र ठरली. एक दिवसापूर्वी तिला दूध पाजून ती परत आली होती. मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील रहिवासी असलेल्या आग्रे कुटुंबात कन्येच्या जन्माने आनंद व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. क्रूर नियतीचा घाला आग्रे कुटुंबीयांना होरपळून टाकणारा ठरला. चिमुकल्या बालिकेचा पार्थिव घरी येताच वातावरण धीरगंभीर झाले. अत्यंत शोकमग्न वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आंधळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ही उपस्थित होते
आईने फोडला हंबरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:27 AM