: मुख्याधिका-यांना निवेदन
लाखनीः शहरातील प्रभाग क्र. ११ व १२ मध्ये समस्यांचा डोंगर असून या प्रभागातील नागरिकांना नगरपालिका. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रभागातील समस्या तत्काळ निकाली काढाव्यात, अशा मागणीचे निवेदन भाजयुमो लाखनी शहर महामंत्री पंकज भिवगडे यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी यांना दिले आहे.
मागील दोन महिन्यांपासून दत्त मंदिर परिसर व कच्छी मेमन हाॅलमागील परिसरातील नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना डासांचा त्रास होत आहे. या परिसरातील नाल्या साफ करून नाल्यांवर कवर लावण्यात यावे व फवारणी करण्यात यावी. तसेच प्रभाग क्र. ११ व १२ मध्ये रस्त्यावरील विद्युत खांबावरील दिवे मागील दोन महिन्यापासून बंद आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत असल्याने या प्रभागामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बसस्थानक परिसरात पाण्याची समस्या मार्गी लावावी. या परिसरात आरो लावण्यात आलेला आहे. मात्र सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे आरो शोभेची वस्तू ठरत आहे. न. प. प्रशासनाने दोन्ही प्रभागातील समस्यांची तत्काळ दखल घेऊन मार्गी लावाव्यात, अशा मागणीचे निवेदन पंकज भिवगडे यांनी लाखनी न. प. मुख्याधिका-यांना दिले आहे.