ठाकचंद मुंगुसमारे यांची माहिती : श्रेयासाठी केविलवाणी धडपड लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली जातात. हे आजवर पाहण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यात चित्र वेगळेच आहे. जी कामे अगोदरच झाले आहेत त्याच कामासाठी सत्तेत सहभागी असणारे आंदोलने करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार करीत आहे, अशी माहिती जिल्हा रायुकाँ कोषाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी दिलीे. गत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नाकाडोंगरी येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात आष्टी जि.प. क्षेत्रातील झालेल्या कामांची परत मागणी करण्यात आली. जिल्ह्यात त्यांच्याच पक्षांचा पालकमंत्री असताना सहज कामे करता येत असताना यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलने व्हायलाच पाहिजे. मात्र कोणती मागणी करायला पाहिजे वा कोणती नाही याचे भान असणे आवश्यक आहे. केवळ जनतेची दिशाभूल करून आपल्यामुळेच शक्य झाले असा सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. आष्टी जि.प. क्षेत्रातील ज्या मागण्यांसाठी आंदोलने झाले. ते पाणी करसाठी झाले. परंतु या अगोदरच जि.प. सदस्या संगिता ठाकचंद मुंगुसमारे, संगीता सोनवाने, सभापती शुभांगी राहांगडाले यांच्या संयुक्त प्रयत्नाने जि.प. मध्ये ठराव घेवून शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी सन २०१५-२०१६ चे गोबरवाही प्रादेशिक नळ पाणी पुरवठाचे बिले हे १८०० रुपयाऐवजी १३२० रुपये प्रमाणे पाणी पट्टी कर घेण्यात आले. तसेच संपूर्ण जि.प. क्षेत्रात दर सोमवार एच.पी. गॅस ही सिहोरा येथील एजंसीकडून पुरविण्यात यते. पाथरी ते धुटेरा व लोभी ते चांदमारा रस्ता मंजुरीकरिता संगिता मुंगुसमारे यांनी क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे यांच्याकडे सतत पाठपुरावा केले. आमदार वाघमारे यांनी त्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ठ करून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास पाठविले आहे. ते लवकरच मंजूर होणार असल्याचे आश्वासन आ.वाघमारे यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे आष्टी ते आंजनबिहरी व धुटेरा ते पुलपुट्टा या दोन्ही ठिकाणी बावनथडी नदीवर पुल बांधण्यासंदर्भातही शासन दरबारी प्रस्ताव पाठविला आहे. हे सर्व असताना याच मुद्यांना उपस्थित करून आंदोलन केले गेले. शासनात हे सत्तेत सहभागी आहेत. मात्र शासनाचे सर्व यांचेच असताना या अगोदरच सर्व समस्या सोडवून घ्यायला पाहिजे होते. जे कामे झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर असताना आंदोलनाचा पिल्लू बाहेर काढून ती कामे आम्हीच केली हे भासवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्रेय जर लाटायचेच असतील तर आधी ते कार्य करून दाखवावे असा टोला ठाकचंद मुंगुसमारे यांनी लावला आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन महत्त्वाचे
By admin | Published: June 19, 2017 12:39 AM