शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

आरक्षणासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:33 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठिय्या देण्यात आला.

ठळक मुद्देसकल मराठा समाज : नागपूर मार्गावरील बससेवा काही काळ ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठिय्या देण्यात आला. तर भंडारा नागपूर मार्गावरील एसटी बससेवा दुपारपर्यंत ठप्प झाली होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी गुरुवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. भंडारा शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले. सकाळी १० वाजताच्या सुमारास शुक्रवारी येथून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात भगवा झेंडा घेतलेले शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दुचाकी रॅली आणि मोर्चाला प्रारंभ झाला. व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान हा मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहचला. त्या ठिकाणी मोर्चेकºयांनी तब्बल पाच तास ठिय्या दिला. यावेळी मराठा आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी राजेंद्र लिमसे, विजय घाडगे, प्रकाश कोलते, अविनाश उन्हाळे, सुनिल कापसे, संजय तुपटे, सुशिल शिंदे, प्रवीण कापसे, सुधाकर घोरपडे, संजय मोहीते, ज्ञानेश्वर निकम, पराग पवार, दिलीप फुकटे, प्रमोद कोल्हे, सतीष घोरपडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.नागपूर येथे काही बसेसवर दगडफेक झाल्याचे वृत्त धडकल्याने भंडारा ते नागपूर बससेवा सकाळी ९ वाजतापासून बंद करण्यात आली. दुपारी ३ वाजतानंतर ही बससेवा सुरू करण्यात आली. शहरातील संपूर्ण वाहतूक मात्र दिवसभर सुरळीत होती. ग्रामीण भागातील बससेवेवरही कोणताच परिणाम जाणवला नाही.आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यामहाराष्ट्र राज्यात मराठा समाज कोट्यवधीच्या घरात आहे. मराठ्यांची कर्मभूमी सुद्धा महाराष्ट्र आहे. इतिहासात आपल्या प्राणांची आहुती या समाजाने स्वराज्याच्या रक्षणासाठी दिली. आजही संपूर्ण देशभर मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्याही हा समाज मागे पडत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMorchaमोर्चा