बैठकीला जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पाेलीस अधिक्षक वसंत जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी गणेश खर्चे उपस्थित हाेते. जिल्ह्यात आतापर्यंत विविवध केंद्राच्या माध्यमातून साडेसहा लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यंदा जवळपास ३६ लाख क्विंटल धान खरेदी हाेण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसाेय हाेवू नये त्यासाठी नविन केंद्र सुरु करावे आणि आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील काेराेना परिस्थिती संदर्भात आढावा घेण्यात आला. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार या गाेसेखुर्द प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या गावाच्या पुर्नवसनाची माहितीही घेतली. या संदभार्त साप्ताहिक बैठकी सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागले असेही सांगण्यात आले. जिल्हृयातील अवैध रेती उपसा संदर्भात पाेलीस अधिक्षक वसंत जाधव यांच्याकडून उपाययाेजनांची माहिती घेण्यात आली.
खासदारांनी घेतला धान खरेदीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:26 AM