शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

महावितरणच्या कारभाराने ग्राहक त्रस्त

By admin | Published: February 08, 2017 1:47 AM

कंत्राटदाराकडून मुदत सपंल्यानंतर वीज बिलाचे वितरण करण्यात आल्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

मुदतीनंतर विज बिलाचे वाटप : ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बारव्हा : कंत्राटदाराकडून मुदत सपंल्यानंतर वीज बिलाचे वितरण करण्यात आल्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन विद्युत बिल वेळेवर कसे मिळतील याची दक्षता घ्यावी, अशी मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे. लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे ३३ केव्ही उपकेंद्र असून कनिष्ठ अभियंता लाडके कार्यरत आहेत. ते लाखांदूर येथून अपडाऊन करीत असल्याने वीज ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच कार्यालयातून विद्युत बिलाचे वितरण कंत्राटदाराकडून करण्यात येते. मागील कित्येक दिवसांपासून विज ग्राहकांना दिेलेल्या तारखेच्या आत संबंधित ग्राहकांच्या हाती विजबिल मिळत नसल्याने दंडापोटी १० ते ५० रूपयाचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. बारव्हा परिसरात ही बाब नित्याचीच झाली आहे. यासंबंधाने काही ग्राहकांनी शाखा अभियंता लाडके यांना या सर्व प्रकाराची माहिती देण्यात आली. मात्र याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. उलट आम्ही बिलाचे वाटप करतो का? ते बिलावरूनच पाठविण्यात येतात. ही चुकी बिल वाटप करणाऱ्यांची आहे. आम्ही काहीही करू शकत नाही. अशी माहिती वीज विभागाच्या अभियंत्यांनी दिली. आधीच विद्युत विभागाकडून वेगवेगळ्या आकारणीच्या माध्यमातून वीज ग्राहकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. त्यात वाहन आकार म्हणून विवरणात समावेश केला आहे. त्यामुळे एवढी लुटमार होत असतांना सुध्दा मुदतीनंतर बिलाचे वाटप करून प्रत्येक ग्राहकांकडून १० ते ५० रूपये दंडापोटी वसुल केले जात आहे. जर हे जास्तीचे बिल भरले नाही अथवा बिल घेण्यास नाकारले तर दुसऱ्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यात येतो. महावितरणच्या या प्रकाराला कुणी आळा घालणार कां? किंवा जनतेची लूट अशीच सुरू राहणार असा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे. (वार्ताहर)