देयके भरण्याचे आवाहन : घरगुती वीज ग्राहकांवर ३.६८ कोटींची थकबाकी देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा मंडळात घरेलू वीज ग्राहकावर थकबाकी रुपये ३ कोटी ६८ लाख आहे. मंडळात वाणिज्यीक व औद्योगिक वर्गात थकबाकीची ही संख्या १ कोटी ५५ लाख एवढी आहे. तसेच पाणीपुरवठा व पथदिवे यांच्यावर असलेली महावितरणची थकबाकी ३ कोटी८७ लाख एवढी आहे, भंडारा महावितरणची १४.७४ कोटींची वीज देयक थकीत आहे.महावितरण गोंदिया परिमंडळाने विविध प्रकारच्या वीज ग्राहकांवर असलेल्या थकीत वीज बिलाची वसुली करण्याकरिता भंडारा गोंदिया जिल्ह्यात मंडळ विभाग, उपविभाग व वितरण स्तरावर विविध वीज वसुली पथके तयार करुन सर्व शहरी व ग्रामीण भागात विज थकबाकी वसुली धडक मोहिम पुन्हा एकदा राबविण्यात येत आहे. वीज बिलाची रक्कम विद्युत बिल भरण्याचा तारखेआधी वीज मंडळाची व इतर अधिकृत वीज बिल भरणा केंद्र येथे त्वरित जमा करण्यात यावी. त्यामुळे महावितरण तर्फे वीज बिल थकबाकी करिता खंडीत होणारा वीज पुरवठा टाळण्यात येईल. वीज ग्राहकांची या उष्णतेच्या दिवसात वीजे अभावी होणाऱ्या त्रासापासून वेळीच वीज बिल भरणा केल्यामुळे सुटका होईल.गोंदिया मंडळात घरेलू वीज ग्राहकांवर थकबाकी रुपये २ कोटी ८० लाख आहे. वाणिज्यीक व औद्योगिक ग्राहकांवर १ कोटी चे जवळपास आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिवे यांच्यावर थकबाकी १० कोटी ९४ लाख एवढी आहे. परिमंडळातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांचे तर्फे थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. महावितरण गोंदिया परिमंडळाकडून वीज ग्राहकांना पुन्हा एकदानम्र विनंती करण्यात आली आहे की आपले थकीत विज बिले भरुन वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळावी व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणची १४.७४ कोटींची वीज देयके थकीत
By admin | Published: May 27, 2017 12:19 AM