शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

महावितरणची पाच दिवसांत ३४ लाखांची वसूली

By admin | Published: November 17, 2016 12:37 AM

थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी अभय योजना कृषी संजीवनी योजना अंमलात आणल्या.

अच्छे दिन : वीज देयके भरण्यासाठी ग्राहकांची गर्दीभंडारा : थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी अभय योजना कृषी संजीवनी योजना अंमलात आणल्या. महावितरणाला थकबाकीदारांकडून वीज बिलाची वसुली करता आली नाही. चलनातून ५०० व १००० रूपयांचे नोट बंद होताच महावितरण कंपनीला अच्छे दिन आले आहे. मागील पाच दिवसात भंडारा-गोंदिया परिमंडळाच्या तिजोरीत एक कोटी ३ लाख रूपये जमा झाले असून भंडारा जिल्ह्यातील थकीत ग्राहकांकडून ३४ लाख १८ हजार रूपयांची वसुली झाली आहे. जुन्या नोटा स्वीकारण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे ग्राहकांनी वीज देयके भरण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रावर एकच गर्दी केली आहे. केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० व एक हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याने राज्य शासनाने कर भरणाऱ्या खातेदारांकडून जुन्या नोट स्वीकारण्याचे निर्देश दिले. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदत असल्याने वीज ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात गर्दी करून थकीत बिले भरली. यातून महावितरणच्या तिजोरीत पाच दिवसात ३४ लाख १८ हजार रूपयांची वसुलीची भर पडली. भंडारा जिल्ह्यात ३९ हजार ७९७ ग्राहकांकडे विज देयकाची कोट्यवधी रूपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महावितरण कंपनीने वसुलीसाठी कृषी संजीवनी योजना व अभय योजना अंमलात आणलेली आहे.कोट्यवधीच्या थकबाकीची वसुली करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येतात. मात्र चलनातून बाद झालेल्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याने योजनांकडे पाठ फिरविलेल्या ग्राहकांकडून वसुली झाल्याने महावितरण कंपनीला दिलासा मिळाला आहे. (नगर प्रतिनिधी)२४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारणार जुन्या नोटावीज बिल भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत महावितरण घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या ५०० व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे. यासाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहे. ग्राहकांचे वीज बिल जेवढ्या रकमेचे राहील तेवढ्या रकमेच्या जुन्या ५०० व हजाराच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. वीज बिलापोटी आगावू स्वरुपात रक्कम स्वीकारण्यात येणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीज बिल भरणा केंद्रावर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. सदर कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करतील. असे महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.