जिल्हा कार्यकारिणी घोषित : जिल्हा महिला प्रमुखपदी रजनी करंजेकरभंडारा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी मुबारक सय्यद यांची सलग तिसऱ्या वर्षी निवड करण्यात आली. यात शिक्षकनेतेपदी राजेश सुर्यवंशी तर जिल्हा महिला प्रमुखपदी रजनी करंजेकर यांची निवड करण्यात आली.तीन वर्षासाठी या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. शिक्षक संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या सभेत शिक्षक संघाचे शेकडो शिक्षक उपस्थित होते. यात सर्वानुमते मुबारक सय्यद यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये राजेश सुर्यवंशी यांची शिक्षकनेतेपदी तर सुधीर वाघमारे यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्षपदी एन.डी. शिवरकर तर राज्य उपाध्यक्षपदी दिलीप बावनकर यांची निवड करण्यात आली. राज्य पदाधिकारी म्हणून विनायक मोथारकर, राधेश्याम आमकर, सुरेश हर्षे तर जिल्हा प्रवक्ता म्हणून श्रावण हजारे यांची निवड करण्यात आली.कार्यालयीन चिटणीसपदी महेश गावंडे, हितेश उईके यांची तर प्रवक्तापदी श्रावण हजारे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून माधव पोले, रामप्रसाद वाघ, केशर मासूरकर, जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून युवराज वणवे, नरेश देशमुख, मकरंद घुगे तर संघटना मार्गदर्शक म्हणून के.डी. भुरे, सुरेश लंजे, दिनेश खोब्रागडे, एकनाथ सुखदेवे, विजय भुरे, अरविंद रामटेके. युवासंघटकपदी शिवानंद नालबंद, जयसिंग राठोड, फारूख शहा, बाबू सलगर, सचिन खटके, लोमेश कोल्हे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महिला संघटिका म्हणून विजया भगत, प्रतिभा गायधने, उमा राऊत, उषा दलाल, सपना खमेले, उषा तिडके, मिनाज शेख, नलिनी दहिवले, प्रिती आत्राम, मिना जांभुळकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने, राजन सव्वालाखे, संजु बावणकर, प्रकाश चाचरे, भैय्या देशमुख, योगेश कुटे, यामिनी गिरीपुंजे, तेजराम वाघाये, विजयी वाघाडे, कुशाबराव भोयर, दिनेश गायधने, देवानंद दुबे, हरीदास धावळे, प्रभू तिघरे, उमेश गायधने, दिलीप गभने, बाळासाहेब आंधळे, उत्तम कुंभारगावे, संजीव खंडाईत, अविनाश निखाडे, अशोक मेश्राम, धनराज वाघाये, विठ्ठल हारगुडे, शिवकुमार भगत, श्रावण लांजेवार, थामसिंग पटेल, विठ्ठल गभने, उमाजी देशमुख आदी बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
मुबारक सय्यद यांची तिसऱ्यांदा निवड
By admin | Published: January 21, 2017 12:31 AM