लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाने देशातील ४१ आयुध निर्माणी कारखान्याचे निर्गमीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विरूद्ध आयुध निर्माणी कामगार संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करून शुक्रवारी जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मुंडण आंदोलन केले.कॉर्पाेरेशन नितीविरूद्ध संयुक्त संघर्ष समितीच्या अंतर्गत न्यु एक्सप्लोसिव फॅक्टरी वर्कर्स युनियन (इंटक) तर्फे सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी इंटकचे कार्यकारी अध्यक्ष विकास बावनकुळे, रंजीत बागडे, आशिष चौधरी, सुशिल बागडे, एस.पी. घरडे, अनिल पात्रे, संदीप हजारे, बी.एम.एस.चे प्रतिनिधी पंकज साकुरे, संजय राऊत, रेड युनियनचे प्रतीनिधी सुरेश मौर्य, संदेश खोब्रागडे आदींनी सहभाग घेतला. यावेळी इंटक युनियनचे महासचिव चंद्रशिल नागदेवे यांनी मार्गदर्शन केले.एकीकडे शासन कारगील विजय दिवस जल्लोषात साजरा करते. चंद्रयान दोन ही मोहीम आयुध निर्माणीत तयार झालेल्या दारू गोळ्यामुळे यशस्वीरित्या पार पडते. अशा आयुध निर्माणींचे निर्गमिकरण करून खाजगीकरणाकडे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. परिणामी याविरूद्ध देशातील ११ ट्रेड युनियन व निर्माणीतील जवळपास एक लाख कर्मचारी २० आॅगस्टपासून संपावर जाणार असल्याची माहितीही संयुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश भोंगाडे, चंद्रशिल नागदेवे, रविकांत अहिरकर, आतिष दुपारे यांनी दिली आहे.मुख्य प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरूद्ध नारेबाजी केली. याप्रसंगी डी.आर. जेठे, ए.आर. मोटघरे, राहिल खान, सरोज चकोले, संघरक्षीत गजभिये, कुंदन चवरे, एकनाथ कुंजेवार, अभिलाश तिवारी, आशिष पेंदाम, निलेश घोडे, के.एल. महतो, जे.के. बिंजवार, अमोल दोडके, कौशिक ढोके, एस.आर. बन्सोड, मिलिंद रोकडे, आशिष चौधरी, डी.आर. हेडावू, पंकज कानेकर यांच्यासह युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचे मुंडण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 10:01 PM
केंद्र शासनाने देशातील ४१ आयुध निर्माणी कारखान्याचे निर्गमीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विरूद्ध आयुध निर्माणी कामगार संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करून शुक्रवारी जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मुंडण आंदोलन केले.
ठळक मुद्देकॉर्पाेरेट नितीचा निषेध : कर्मचाऱ्यांनी दिला संपावर जाण्याचा इशारा