लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांमुळे शहरातील वातावरण दुषित झाले आहे. पावसाळयाच्या दिवसांतही नगरपरिषदेने कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील कचºयांचा वाढत चालल्याने शहराच्या अनेक भागात स्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहेत.शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. पालिकेव्दारा नागरिकांकडून नियमितपणे करवसुली केली जाते. परंतू सुरळीतपणे सेवा मिळत नसल्याने नगरपालीका अपयशी ठरल्याचे दिसून येते. पावसाळयाच्या दिवसांतही ठिकठिकाणी कचºयाचे ढिग दिसत असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना दुगंर्धीचा त्रास होत आहे. नगरपालीकेव्दारे शहरातील घनकचरा गोळा करण्यासाठी अनेक ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले आहेत परंतू कंटेनर उचलण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे बऱ्याच भागात उघड्यावर कचरा टाकला जातो. कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक ड्रमची कधीच वाताहत झाली आहे. पूर्वी सिमेंटच्या बांधलेल्या टाक्यात कचरा टाकला जात होता. त्यानंतर कंटेनरची सोय करण्यात आली. पुढे कंटेनरही नाहिसे झाले. त्याची जागा फिरत्या गाड्यांंनी घेतली. बºयाच वसाहतींमध्ये या फिरत्या गाड्या पोहोचत नसल्याने नागरिकांची ओरड सुरु आहे.काही ठिकाणी नागरिकांचे सहकार्य मिळत नसून अनेकजण कचरा उघड्यावरच टाकतात. ओला कचरा व सुका कचरा एकत्रित आल्याने कचरा टाकल्या जाणाऱ्या परिसरात दुर्गधी पसरत आहे. यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीची गरज आहे. वाऱ्यामुळे बऱ्याचदा आजूबाजूला हा कचरा पसरत असल्याने व्यापाऱ्यांना देखील त्रास होत आहे. अनेकदा रुमाल लावूनच रस्त्यावरुन चालाव्े लागते.त्यामुळे साथीच्या आजारांत वाढ होण्याची शक्यता आहे. बसस्थानकासह,मोठा बाजार परिसरात कचरा वाढल्याने नागरिकांना भाजीपाला बाजारात जाणे धोकादायक ठरत आहे.त्यामुळे कचऱ्याच्या समस्येकउे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे.कचऱ्याची समस्या वाढलीस्टेट बँकेलगत असलेल्या पालिकेच्या जुन्या शाळेत नागरी आरोग्य केद्र आहे. येथे कचरा टाकण्यासाठी खांबाला लावलेले ड्रम केव्हाच उखडून पडले आहेत. त्यामुळे नागरिक उघडयावर कचरा टाकतात. गांधी चौकात पोहा गल्लीसमोर नाल्यालगत दररोज कचऱ्याचा खच पडलेला असतो.या भागात व्यापारी दुकाने आहेत. पावसामुळे हा कचरा कुजल्याने परिसरात दुर्गधी पसरत आहे. जनावरे अन्नाच्या शोधार्थ फिरत असल्याने हा कचरा रस्त्यावर पसरतो आहे यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:04 AM
शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. पालिकेव्दारा नागरिकांकडून नियमितपणे करवसुली केली जाते. परंतू सुरळीतपणे सेवा मिळत नसल्याने नगरपालीका अपयशी ठरल्याचे दिसून येते.
ठळक मुद्दे नागरिक म्हणतात, सण उत्सवात तरी लक्ष द्या : प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची गरज