बाजार चौक ते संजय नगर हा सुमारे तीन किलोमीटरचा रस्ता अक्षरश: खड्ड्यांनी भरलेला आहे. सदर रस्त्याच्या बांधकामाकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ लोकप्रतिनिधींकडे मागणी केलेली आहे. गत तीन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था खराब आहे. हा रस्ता जिल्हा परिषदचे अंतर्गत येत असल्याने बांधकाम त्या अंतर्गतच करण्याचे नियोजित आहे. परंतु सदर रस्त्याला लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर यश आलेले दिसत नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी लाईन सजलेली आहे. आधीच अरुंद रस्ता व त्यात दुकानदारांचे ग्राहक व वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीला मोठी अडचण तयार आहे. पावसाच्या दिवसात रस्त्यातील खड्डे परिपूर्णता भरलेली असतात. एखाद्या वाहनाने खड्ड्यातील गढूळ पाणी उडवल्यास थेट पादचाऱ्यांच्या अंगावर उडले जाते. त्यामुळे त्याची संपूर्ण कपडे खराब होतात. याचा थेट फटका सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांना बसतो. तेव्हा ही समस्या प्राथमिक स्वरूपात दूर करण्याकरिता ग्रामपंचायत पालांदूर यांनी पुढाकार घेतलेला आहे. पडलेले खड्डे बुजविण्याकरिता व मुरमाचा आधार घेतला जात आहे. सदर रस्ता लवकरात लवकर बांधणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
को
कोट
गावातील मुख्य रस्ता जागोजागी फुटलेला आहे. त्याच्या बांधकामाकरिता वारंवार मागणी केलेली आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरून अजून पर्यंत सदर रस्त्याला निधीची तरतूद झालेली नसल्याने रस्ता फुटलेल्या स्थितीत आहे. नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता सामान्य फंडाच्या आधाराने मुरूम व गिट्टीचा आधार दिला जात आहे.
पंकज रामटेके, सरपंच, पालांदूर
कोट
पंतप्रधान ग्रामसडक योजनेत सदरचा रस्ता प्रस्तावित आहे. केंद्र सरकारच्या योजनेत रस्ता प्रक्रियेत असल्याने विलंब होत आहे. प्रक्रिया पूर्ण होताच रस्ता बांधल्या जाईल.
शैलेश हरकंडे, अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भंडारा.
कोट
गावातील दोन्ही रस्त्याच्या बांधकामासाठी वरिष्ठ लोकप्रतिनिधींकडे शिष्टमंडळासोबत मागणी केलेली आहे. मागणी पूर्ण करण्याचा शब्द मिळालेला आहे. परंतु कोरोना संकटाने निधीचा वानवा असल्याचे बोलले जात आहे.
हेमराज कापसे, उपसरपंच, पालांदूर.