मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गौण खनिज उत्खननाचे अतिशय कडक नियम आहे. परंतु तुमसर तालुक्यातील परसवाडा (दे) मांढळ शिवारात रस्ताशेजारी परवानगीविना शेकडो ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येथे परवानगी मागविण्यात आली. परंतु अद्यापर्यंत परवानगी मिळाली नाही. तरी येथे पोकलॅड यंत्राने मुरुम उत्खनन सुरुच आहे.मनसर-गोंदिया दरम्यान राष्टÑीय महामार्गाचे काम सुरु आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरावाकरिता मुरुमाची अत्यंत गरज आहे. मुरुम भरावाकरीता परिसरात रितसर लीज मुरुम कंत्राटदारांनी घेतली आहे, परंतु परसवाडा-मांढळ शिवारात रस्त्याच्या शेजारी एका खाजगी गटात नियमबाह्य मुरुम उत्खननाचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. सुमारे १० ते १२ फुट खोल भले मोठे खड्डे मुरुम उत्खननामुळे तयार झाले आहेत. येथे पोकलँड यंत्राने मुरुम उत्खनन करणे सुरु आहे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसुल निश्चितच बुडत आहे.येथील कंत्राटदाराने खाजगी गट मालकाकडून परवानगी घेऊन मुरुम उत्खननाची परवानगीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा खनिकर्म विभागाकडे सादर केल्याची माहिती आहे. स्थानिक तहसील प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले नाही. अशी माहिती आहे. ५०० ब्रासपेक्षा जास्त मुरुम उत्खननाकरिता थेट जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी परवानगी देतात अशी माहिती आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित कंत्राटदाराला अजूनपर्यंत मुरुम उत्खननाची परवानगी मिळाली नाही. अशी माहिती आहे, परंतु मुरुम उत्खननला येथे सुरुवात करण्यात आली. स्थानिक तलाठी कार्यालयाकडे या संदर्भात माहिती उपलब्ध नाही.तहसील प्रशासनाकडे अजूनपर्यंत परवानगीचे पत्र जिल्हास्तरावरुन आले नाही, असे समजते. त्यामुळे येथे सावळागोंधळ सुरु आहे. याप्रकरणी तहसील प्रशासन येथे कारवाई करणार असल्याचे समजते.मुरुमाचा वापर रस्ता भरावातमनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता भरावात मुरुमाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. हजारो ब्रास मुरुमाची येथे गरज आहे. यापूर्वी मोहाडी तालुक्यातील मुरुम लीज प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथे रस्ता बांधकाम कंत्राटदाराचा मुरुम उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराशी थेट संबंध नाही. मुरुम उत्खनन करणारा कंत्राटदार हा पुरवठादार आहे.परसवाडा-मांढळ शिवारात मुरुम उत्खनन प्रकरणी तहसील प्रशासनाकडे कागदोपत्री माहिती पुरविण्यात आली नाही. येथे थेट भंडारा मुख्य कार्यालयाकडे परवानगी मागितली असेल. सध्या मुरुम उत्खनन करणाऱ्याकडे परवानगी नसल्यास गौण खनिज नियमाअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर
परवानगीविना मुरुमाचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 9:41 PM
गौण खनिज उत्खननाचे अतिशय कडक नियम आहे. परंतु तुमसर तालुक्यातील परसवाडा (दे) मांढळ शिवारात रस्ताशेजारी परवानगीविना शेकडो ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येथे परवानगी मागविण्यात आली.
ठळक मुद्देप्रकरण परसवाडा-मांढळ शिवारातील