शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

डांबरी रस्त्यांना मुरुमाचा लेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 10:04 PM

तुमसर शहरात श्रीराम नगरातील मुख्य मार्गावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे.

ठळक मुद्देतुमसरातील प्रकार : सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहरात श्रीराम नगरातील मुख्य मार्गावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. डांबरी रस्त्यावरील खड्डे, मुरुम, गिट्टी टाकून बुजविण्याच्या प्रकारामुळे या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दिवसभर खड्ड्यातील धुळ वातावरणात मिसळत असून नागरिकांना श्वसनाचा आजार बळावित आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.तुमसर शहरातून तुमसर-भंडारा-कटंगी हा राज्यमार्ग जातो. श्रीराम नगरातील प्रमुख रस्ता खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यात गिट्टी, मुरुम टाकून बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. खड्ड्यातील मुरुमाची धुळ वातावरणात मिसळत आहे. गड वाहतुकीने संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य दिसते. वृद्ध, लहान मुलांना यामुळे श्वसनाचा आजारासोबतच डोळ्यांचा आजार बळावले आहेत. अनेक जणांनी याबाबत तक्रार केली.डांबरी रस्त्यावरील खड्डे चुरी आणि डांबराचा वापर करून बुजविले जातात. मात्र या विभागाने डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मुरुम व गिट्टीचा वापर केला. सर्वच खड्डे गिट्टी व मुरुम टाकून बुजविले गेल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारावर कुणीच आक्षेप घेतले नाही हे विशेष. श्रीमंत नगरी म्हणून ओळख असलेल्या शहरात राजकीय नेत्यांची संख्याही मोठी आहे. ऐरवी आंदोलनाचा इशारा देणाºयांनी किमान याबाबत आंदोलन करण्याची गरज आहे. नियम धाब्यावर बसवून खड्ड्यात गिट्टी व मुरुम टाकून मोकळे होण्याचा प्रकार सुरु आहे. चुरी व डांबर घालून खड्डे तयार करण्याच्या नियमाला येथे धाब्यावर बसविण्यात येत आहे. मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्याचे देखरेख व नियंत्रण आहे. सुमारे २०० मिटर रस्त्यावर येथे खड्डे पडले आहेत. बसस्थानक परिसरातील रस्त्यावर सुद्धा खड्डे पडले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून संध्याकाळी या रस्त्यावर धुळीचे कण सर्वत्र दिसतात.