जुलै महिन्याच्या २५ तारखेला तुमसर तालुक्यातील राजापूर येथे अघटीत घटना घडली. अंधश्रध्दा काेणत्या स्तराला घेवून जावू शकते याचा अनुभव या घटनेने आला. जादूटाेणा करण्याच्या संशयावरुन चार व्यक्तींची नग्नधिंड काढण्यात आली. संपूर्ण गावभर नग्न फिरविल्यानंतर चाैकात पेट्राेल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाला. गाेबरवाही पाेलिसांच्या मदतीने या चाैघांचा जीव वाचला. मात्र या घटनेचे पडसाद उमटत राहिले. गावातील २४ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या घृणास्पद घटनेचा सर्वांनीच निषेध केला. विज्ञान युगातही अंधश्रध्देचे पायेमुळे कसे खाेलवर रुजली आहे आणि त्यातून अशा घटना घडतात हे राजापूरच्या घटनेने पुन्हा एकदा अधाेरेखीत केले आहे.
भंडारा जिल्हा तसा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जाताे. परंतु खून, मारामारी आणि अपहरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. अडीच ताेडे साेन्यासाठी तीन मित्रांनी आपल्या मित्राचाच जीव घेतल्याची चर्चा वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात घडली. साेमलवाडा येथील दयाराम टिचकुले यांचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याची ओळख पटविण्यासाेबतच साेन्याच्या लालसेतून मित्रानीच खून केल्याचे पुढे आले हाेते. २६ नाेव्हेंबरच्या रात्री पार्टी करण्यासाठी दयारामला घेवून त्याचे तीन मित्र साकाेली तालुक्यातील सुंदरजवळील धाब्यावर गेले हाेते. तेथे मनसाेक्त दारु पाजून त्याला साेनेगाव काेका जंगलाकडे आणले. तेथे त्याचा गळा आवळून खून करुन अडीच ताेडे दागीने काढून घेतले. कारधा पाेलिसांच्या शिताफीने आराेपी गजाआड झाले मात्र या घटनेने मैत्रीवरचा विश्वास कमी हाेताे काय? असे वातावरण निर्माण झाले.
बाॅक्स
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करुन नात्याला कलंक
पती-पत्नीचे नाते विश्वासावर असते. एकमेकांवर जीवापार प्रेम करीत संसाराचा गाढा ओढायचा असताे. परंतु काेरंभी येथील वैनगंगा नदीत एका पाेत्यात आढळलेल्या मृतदेहाने नात्यालाच कलंक लावला. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकाराच्या मदतीने खून केल्याची घटना १२ डिसेंबर राेजी उघडकीस आली. नंदकिशाेर सुरज रहांगडाले या तरुणाचा पत्नी आणि त्याचा प्रियकारानेच खून केला. नागपूर भंडारा मार्गे स्वगावी जात असताना लाखनी तालुक्यातील सालेभाटाजवळ नियाेजीत कटाप्रमाणे ठेकेदार साेमेश्वर पारधी, लेखाराम टेंभरे आणि नंदकिशाेरची पत्नी याेगेश्वरी उर्फ गुड्डी यांनी लाेखंडी सलाख ठाेक्यात घालून ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाेत्यात बांधून वैनगंगा नदीच्या पुलावरुन खाली फेकला. मात्र आराेपी कितीही हुशार असले तरी पाेलीस तेथपर्यंत पाेहचतातच याचाही प्रत्यय या घटनेने आला.
बॅंक दराेड्याने उडाली खळबळ
साकाेली तालुक्यातील सानगडी येथील स्टेट बॅंकेत पडलेल्या दराेड्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. २२ डिसेंबरच्या रात्री चाेरट्यानी बॅंकेच्या इमारतीची खिडकी ताेडून आत प्रवेश केला. दीड किलाे साेन्यासह २८ लाख राेख रक्कम असा ७५ लाख ८५ हजार ९७३ रुपयांचा ऐवज लंपास केला. अद्यापही चाेरटे पाेलिसांच्या हाती लागले नाही.