राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष : रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्तावही थंडबस्त्यातइंद्रपाल कटकवार भंडारामुंबई व कलकत्ता या दोन महानगरांना जोडणारा मार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आहे. हा महामार्ग भंडारा जिल्ह्यातून गेला असल्याने शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेला महत्व वाढले आहे. परंतु याच महामार्गावरील सुविधांना मात्र गळती लागली आहे. शहरातून गेलेल्या महामार्गाच्या दुतर्फा नाल्यांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी या नाल्या भुईसपाट झाल्या आहे. भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या महामार्गाची लांबी ७० कि़मी. आहे. १५ लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयातून जवळपास ३.३० कि़मी. लांबीचा महामार्ग गेला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा नालीचे बांधकाम होणे अगत्याचे आहे. दशकभरापुर्वी महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पहिल्या टप्प्यात शिंगोरी फाटा ते देवरीपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात बेला ते पारडी नाकापर्यंत रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आले. परंतु शिंगोरी फाटा ते बेला पर्यंतच्या या १० कि़मी. रस्त्याचे विस्तारीकरण अजूनही रखडलेले आहे. शहरातून उड्डाणपुल होणार की नाही ही बाब अजूनही स्पष्ट झाली नाही. उल्लेखनीय म्हणजे या १० कि़मी. रस्ता विस्तारीकरणाचा प्रस्ताव अजूनही थंडबस्त्यात आहे. नाल्यांमध्ये वाढली झाडी-झुडपेशहरातील उपमुख्य तथा गल्ली बोळीच्या रस्त्यामध्ये एका बाजूला नालीचे बांधकाम केले जाते. मात्र राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम होणे महत्त्वाचे आहे. भंडारा नगरपालिकेच्या हद्दीनुसार शहराची सीमा नागपूर नाक्यापासून सुरूवात होऊन आॅफिसर क्लबपर्यंत असणाऱ्या रस्त्यापर्यंत (वैनगंगानदी काठ) आहे. शहरातून गेलेल्या महामार्गाच्या दुतर्फा नाली बांधकामासाठी खोदकाम केलेली ही नाली दिसून येत असली तरी ती पक्क्या स्वरूपात नाही. सद्यस्थितीत या नालींमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा व झाडी झुडपे वाढली आहेत.महामार्गावर पेट्रोलपंप, शाळा, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रशासकीय भवन यासह हॉटेल्स, प्रवाशी थांबा, मोटार गॅरेज व अन्य दुकाने आहेत. महामार्गावरील नाल्याची अशी दुरवस्था बघून बाहेरील जिल्हावासी काय बोध घेतील.
राष्ट्रीय महामार्गावरील नाल्या भुईसपाट
By admin | Published: March 31, 2017 12:28 AM