यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, कोमल कांबळे, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, फुलचंद बडोले, सुधाकर सुखदेवे, जयपाल रामटेके, अश्विन शहारे, पी.जी.देशपांडे, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, अरुण ठवरे, नरेंद्र कांबळे, मिताराम शेंडे, नितीश काणेकर, सुरेश शेंडे, जितेंद्र खोब्रागडे, सुबोध शेंडे उपस्थित होते.
नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा लढा नव्हता, तर तो समता स्वातंत्र्य बंधुभाव एकात्मता निर्माण करणारा लढा होता. सतत प्राणाची बाजी लावून बलिदान देणाऱ्या लढवय्या भीम सैनिकांच्या लढ्यामुळेच अखेर १४ जानेवारी, १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे नामविस्तार झाले, म्हणून भीम सैनिकांनी दरवर्षी हा दिवस ‘स्वाभिमान अस्मिता दिवस’ म्हणून चिरकाल स्मरणात ठेवावा, असे प्रतिपादन प्रकाश देशपांडे यांनी केले. संचालन सुबोध शेंडे तर आभार जितेंद्र खोब्रागडे यांनी मानले.