शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

चालानच्या नावावर वाहनचालकांची लूट

By admin | Published: November 16, 2015 2:08 AM

धान, भाजीपाला यासह अन्य शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस काढली आहे. ग्रामीण भागातील वाहन चालकांच्या वाहनांना याच हंगामात काम मिळते;...

भंडारा : धान, भाजीपाला यासह अन्य शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस काढली आहे. ग्रामीण भागातील वाहन चालकांच्या वाहनांना याच हंगामात काम मिळते; पण वाहतूक शाखेच्या दडपशाहीला वाहनचालक कंटाळले आहेत. दररोज शहरात जावे लागत असल्याने चालान न घेता पैसे उकळले जात असल्याचे वाहन चालक सांगतात. गाडी ओव्हरलोड आहे, वजन करावे लागेल, अडीच हजारांची चालाण लागेल, अशा स्वरूपाच्या वक्तव्याने अधिकाधिक रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्याही तक्रारी आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी म्हणून पैसे घेतात काय? असा संतप्त सवाल ग्रामीण युवक उपस्थित करीत आहेत. पॉईंट सोडून भलतीकडेच शिपाई फिरताना दिसतात, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. शहरातील युवक पोलिसांच्या समोर भरधाव जातात. त्यांना अडविले जात नाही; पण ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना कारण नसताना थांबविले जाते. अधिक रकमेच्या चालाणची भीती दाखवून पैसे घेतले जात असल्याची चर्चा आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून अवैध वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी, आॅटो सोडून दुचाकी चालकांवरच अधिक कारवाई होताना दिसते. यामुळे ग्रामीण नागरिक दुचाकी घरी ठेवून आॅटोने भुर्दंड सोसत शहरात जात असल्याचे दिसते.वाहनांचे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे. दारासमोर बैलजोडी दिसणार नाही; पण दुचाकी हमखास दिसते, अशी स्थिती आहे. ग्रामीण भागातही प्रत्येक घरी दुचाकी असल्याचे दिसते. वाहतूक सोईची व्हावी म्हणून वाहनांचा वापर वाढत असला तरी वाहन चालकांना पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार दररोज घडत आहे.याच प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरी मोटारसायकल असताना आॅटोने प्रवास करताना दिसतात. शहरात कोणत्याही रस्त्याने गेले तरी वाहतूक पोलीस शिपाई ग्रामीण नागरिकांना अडवितात. या प्रकारामुळे अनेक युवक त्रस्त झाले आहेत. कागदपत्राची चौकशी करताना एखादा कागद नसला तरी त्याला चालाण फाडावी लागेल, असे ग्रामीण युवक सांगतात.दुसरीकडे शहरी युवक वाहतूक भरधाव जात असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसते. वाहतूक शाखेतील काहींमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे. यावर लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामीण वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)