पवनी : पत्र्त्रा मेत्ता संघाच्या महासमाधीभूमी महास्तुपाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या पूर्व दिनी रुयाळ सिंदपुरी टी पार्इंट चौकाचे महासमाधीभूमी चौक असा फलक लावून नामकरण करण्यात आले. या फलकाचे उद्घाटन भदंत संघरत्न मानके, जपानच्या राजघराण्याच्या विहाराचे भदंत सोमोन होरिसावा, भदंत खाखुआ एनामी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात संघरत्न मानके यांनी सांगितले की, भगवात बुध्दाने विश्वाला शांतीचा संदेश दिला. मानवतावादी असलेल्या बौध्द धर्माच्या प्रसाराचे कार्य येथून मागील तीस वर्षापासून सुरु आहे. म्हणून या चौकाला महासमाधीभुमी चौक असे नाव दिले आहे. भगवान बुध्दाचा शांतीचा संदेश देणारा व मानवतेची शिकवण देण्याची दिशा देणारा हा चौक ठरावा अशी आशा व्यक्त केली.याप्रसंगी रुयाळच्या सरपंच कवीता मोटघरे, उपसरपंच श्रीकांत भोगे, शिलमंजू सिंहगडे, रमेश मोटघरे, श्रीकांत शहारे, लोमेश सुर्यवंशी, धम्मानंद मेश्राम, ललीता भुरे, सुनीता मेश्राम, शत्रुघ्न खोब्रागडे, विजय मानापुरे, किशोर भुरे, हेमंत मेनवाडे, लिलाधर मेनवाडे, बंडू रामटेके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अॅड. गोस्वामी व आभार अरविंद धारगावे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
सिंदपुरी टी पार्इंट चौकाचे महासमाधीभूमी चौक नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2017 12:32 AM