लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे तत्त्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली आहे.शुक्रवारला दुपारी ४ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोंडेकर यांची नियुक्ती करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, खा.अनिल देसाई, पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख निलेश धुमाळ उपस्थित होते.यावेळी लोकसभा पोटनिवडणूक लढत असलेले आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख अनिल गायधने, विजय काटेखाये, प्रशांत भुते आणि शिवसैनिक उपस्थित होते.
जिल्हाप्रमुखपदी नरेंद्र भोंडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:35 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे तत्त्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली आहे.
ठळक मुद्देनिवडणुकीची धामधूम : अपक्ष उमेदवार किशोर पंचभाईचा सेनेत प्रवेश