न्यायाधीश एस. बी. साबळे व वकील संघाचे अध्यक्ष ॲड. जी. एच. झोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होते. या अदालतमध्ये प्रलंबित ८७ खटल्यांपैकी ४४ प्रकरणे व वाद होण्यापूर्वीच्या खटल्यांपैकी ६३२ अशी एकूण ६७४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या वेळी निकाली प्रकरणांतर्गत तडजोड होऊन सुमारे १६ लाख ९६ हजार ५४४ रुपयांची वसुलीही करण्यात आली.
दरम्यान, येथील न्यायालयात ग्रामपंचायत, बँक, प्रलंबित खटले व वीज कंपनी अंतर्गत जवळपास २ हजार ४०५ प्रकरणे न्यायप्रविष्ट असून राष्ट्रीय लोक अदालतीत ६७४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे न्यायालयीन प्रकरणांचा भार कमी होतानाच नागरिकांनादेखील दिलासा मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
250921\img20210925134426.jpg
राष्ट्रीय लोकअदालतीत प्रकरणे निकाली काढतांना न्या एस बी साबळे व अन्य कर्मचारी