भंडारा : राजीव गांधी महाविद्यालय सडक-अर्जुनी तथा वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन साकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने योग दिनानिमित्त एकदिवसीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. जीवनामध्ये योगाचे महत्त्व काय? या विषयाच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये देशातील विविध राज्यांतून मान्यवर व विद्यार्थी बहुसंख्येने ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थित होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपकुलपती डॉ. अर्जुनसिंग राणा, मुख्य मार्गदर्शक डॉ. विक्रम सिंग, डॉ. सुधीरकुमार शर्मा उपस्थित होते. प्रदीर्घ अनुभव सर्व विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना त्याचबरोबर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना सांगितले. योग आणि शारीरिक व्यायाम नवीन अभ्यासक्रमांमध्ये असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्जुन सिंग राणा यांनी केले. परिचय डॉ. सुनीलकुमार चतुर्वेदी यांनी करून केला. प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर यांनी केले. संचालन रजनी गायधने यांनी केले. यावेळी प्राचार्य घनश्याम निखाडे, राकेश चकोले, प्रा. देवेंद्र इसापुरे, शैलेश फुंडे, श्वेता चिंदालोरे, प्राचार्य अनिल गायकवाड, प्राचार्य खेमराज राऊत, प्राध्यापक डॉ. संजय पाखमोडे, डॉ. रमेश अग्रवाल, अरुण उपरीकर, प्रा. पुकराज लांजेवार, मिथुनकुमार, साहिल सय्यद उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
योग दिनानिमित्त राष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:25 AM