यावेळी प्राचार्य देवेंद्रकुमार रंभाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षारोपणाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. कोविडचा प्रादुर्भाव असताना संपूर्ण देशात ऑक्सिजनची कमतरता असल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले. ऑक्सिजन निर्मिती आपल्याला वृक्षसंवर्धन केल्याने होईल, अन्यथा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. असे सांगून कोविड प्रादुर्भाव टाळण्यासाठी शक्यतो स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वयंप्रेरणेतून समाजाची सेवा, व्यक्तिमत्त्व विकास व विशेष विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना रुजवून खऱ्या अर्थाने आपण भावी पिढी राष्ट्र निर्मितीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कराल, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या छोटेखानी कार्यक्रमात प्राचार्य रंभाळ यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी संदीप चामट यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
साई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:38 AM