शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

निसर्गाची करणी अन् झाडात साकारले गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:33 PM

सध्यास्थितीत जिल्ह्यात गणेश उत्सवाची धामधूम सुरु आहे. आकर्षक व देखण्या मुर्त्यासह सुंदर सजावट व देखावे या उत्सवात आनंदाची भर पाडतात. पण वरठी येथे यापेक्षा वेगळी संकल्पना राबवण्यात आली आहे. पर्यावरणक पूरक उत्सव साजरा करण्याची संकल्पना समोर ठेवून चक्क वडाच्या झाडाला गणेशजींचे स्वरूप देण्यात आले.

ठळक मुद्देवरठीच्या जगनाडे चौकात अभिनव प्रयोग : झाडात अवतरले साक्षात गणेशजी

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सध्यास्थितीत जिल्ह्यात गणेश उत्सवाची धामधूम सुरु आहे. आकर्षक व देखण्या मुर्त्यासह सुंदर सजावट व देखावे या उत्सवात आनंदाची भर पाडतात. पण वरठी येथे यापेक्षा वेगळी संकल्पना राबवण्यात आली आहे. पर्यावरणक पूरक उत्सव साजरा करण्याची संकल्पना समोर ठेवून चक्क वडाच्या झाडाला गणेशजींचे स्वरूप देण्यात आले. अरविंद येळणे यांच्या संकल्पनेला पेंटर स्वप्नील रामटेके व सहाय्यक मंगेश लाडे यांनी जिवंत स्वरूप दिले आहे. निसर्गाची करणी अन नारळात पाणी या उक्तीप्रमाणे साक्षात झाडात अवतरलेले गणेशजींचे चित्र रेखाटण्यात आले.निसर्गाचा अनमोल वारसा जपणाऱ्या झाडातून हुबेहूब गणपती साकार करण्यात आल्याने भाविकांची रेलचेल सुरु आहे. कोणतीही सजावट वा देखावा निर्माण न करता तयार करण्यात आलेली ही संकल्पना चर्चेचा विषय ठरत आहे.वरठी गावात प्रवेश करताना जगनाडे चौक पडतो. या चौकातील जगनाडे मंदिर परिसरात वडाचे झाड आहे. हे झाड या अभिनव कल्पनेचे माध्यम ठरले आहे. गत अनेक वर्र्षांपासून या मंदिरात गणेश उत्सव साजरा करण्यात येत होता. यावर्षी निर्सगाला पूरक असा उत्सव साजरा करण्याची कल्पना अरविंद येळणे यांच्या डोक्यात आली. त्यामुळे ते उत्सव साजरा करण्याच्या बाबत विचार करीत होते. उत्सव साजरा करायचा पण यासाठी पर्यावरणाला धोका होणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी ठरवले होते. मंदिरात असलेल्या झाडाला गणेशजींचे स्वरूप असल्याचे त्यांना जाणवले. लगेच त्यांनी वरठी येथील ख्यातनाम पेंटर स्वप्नील रामटेके याना बोलावून संकल्पना सांगितली. संकल्पनेला अनुसरून पेंटर दिमागत युक्ती सुचली आणि त्याच्या प्रत्यक्ष रेखाटनं करण्यात आले. नकळत झाडाने उत्कृष्ठ साथ दिली. गणेशजींचे स्वरूप तयार करण्यासाठी लागणारे संपूर्ण आकार झाडाच्या पूवार्धातच मिळाले. यामुळे झाडाला कोणतीही इजा न करता साक्षात स्वरूप देता आले.े झाडाला कोणतीही नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली. झाड रंगवण्यासाठी वॉटर कलर वापरण्यात आले. त्यामुळे ते सहज मिटवता येतील. अलीकडे गणेश उत्सव साजरा करण्याकरिता मुर्त्यांची निर्मिती करण्यापासून ते सजावट करण्यापर्यंत होड लागते. मोठ्यात मोठी मूर्ती व आकर्षक सजावट यावर भर दिला जातो. पण यामुळे कुठतरी पर्यावरणाला धोका निर्माण होतो याचा भान राहत नाही. यासर्र्वांचे भान ठेवून ही कल्पना अरविंद येळणे यांनी पूर्णत्वास आणली. दिवसेंदिवस या मूर्तीचे दर्शन घेणाºया भाविकांची गर्दी वाढत आहे. एरवी उत्सव हे ठराविक काळात भाविकांच्या गर्दीने फुल्ल असतात. पण सध्या जगनाडे चौक भाविकांच्या गर्दीने दिवसभर फुलून दिसते. मी दगडात किंवा मंदिरात नसून या सृष्टीच्या प्रत्येक कणात असल्याचे संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अरविंद येळणे यांनी दिली. गणेश चतुर्थीर्चे माध्यमातून गावात स्वच्छता मोहीम व झाडे लावा झाडे जगवा असा विचार समाजात रुजवण्याचे प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.रवी येळणे यांच्या प्रयत्नाांना यशगावाच्या प्रवेश द्वारावर श्री संत जगनाडे महाराज यांचे जुने मंदिर आहे. मंदिराला सुरक्षा भिंत नसल्यामुळे ओसाड वाटत होते. परिसरात कितीही झाडे लावली तरी जगत नव्हती. दिवसभर वाहनांची रेलचेल आणि होणारे प्रदूषण यामुळे मंदिर परिसर भकास वाटायचे. रवी येळणे यांनी हे हेरून पंचायत समिती सदस्य असताना यासाठी विशेष प्रयत्न केले. मंदिराच्या चारही बाजूला सुरक्षा भिंतीचे काम मंजूर करवून पूर्णत्वास नेले. आज हे मंदिर गावाचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मंदिर परिसरात झाडाचे डोलारे यासह भाविकांसाठी बसण्याचे खुर्च्या लावण्यात आले आहेत. दररोज शेकडो नागरिक या मंदिर परिसरात वेळ घालवण्यासाठी येत जात असतात. आकर्षक मंदिर परिसर रवी येळणे यांच्या प्रयत्नाचे फलित असून त्यांची जिल्ह्यात ख्याती आहे.