शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

नवतपात भंडाराचा पारा ४७ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:11 AM

उन्हाच्या तडाख्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने भंडाराचे कमाल तापमान ४६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. नवतपाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच बुधवारला भंडाराचा पारा ४७ अंशावर पोहचला. मंगळवारला पारा ४६ अंश नोंदविण्यात आले होते.

ठळक मुद्देजनजीवन प्रभावित : हवामान खात्याने वर्तविला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाच्या तडाख्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने भंडाराचे कमाल तापमान ४६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. नवतपाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच बुधवारला भंडाराचा पारा ४७ अंशावर पोहचला. मंगळवारला पारा ४६ अंश नोंदविण्यात आले होते.हवामान खात्याने विदभार्साठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे नवतपात जिल्हावासयिांची परीक्षाच होत आहे. उन्हाळ्याचे अखेरचे दिवस म्हणजे अंगावर काटा आणणारे ठरतात. याच दिवसात नवतपा सुरू होतो. नवतपा म्हणजे सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत.नवतपा सुरू झाल्यापासून जिल्हावासियांची अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच गरमी जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. सोमवारी कमाल ४६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान २ अंशांनी अधिक होते तर किमान २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचा मारा काही अंशी झालेली ढगांची गर्दी यामुळे उकाड्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण कोरडे झाले आहे. अजून आठवडाभर तापमान ४६ अंशांहून अधिकच राहील व उष्णतेची लाट कायम असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. दरम्यान दिनांक पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वाºयासह पावसाच्या सरी बरसणार असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.दरम्यान, मागील आठवडाभरात तापमानात दोन अंशांहून अधिक वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी ४५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने पारा चढत गेला. लोकसभा निवडणूकांच्या निकालांच्या दिवशी ४६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे शेतीकामे दुपारी ठप्प होत आहे. तापमानामुळे सकाळी ११ वाजतापूर्वीच शेतकरी आपली कामे आटोपून घराकडे परत येत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी शेतशिवारात शुकशुकाट दिसत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान