साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट ॲण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल सीबीएसई साकोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद सर, उपप्राचार्य पांडुरंग राउत सर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक छबू समरीत यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात परिचय दिला. त्यात त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांच्या जीवनाची सुरूवातच मुळात संघर्षमय झाली. जातीयतेच्या अनिष्ठ प्रथेविरूद्ध त्यांनी संघर्ष केला. तळागळातील मागासलेल्या समाजाला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले. स्वत: अनेक व्यथा सहन करून त्यांनी दुसऱ्यांचे जीवन सुखमय केले. त्यांच्या अफाट ज्ञानामुळेच त्यांना भारतीय संविधानाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी अहोरात्र जागून भारताचे संविधान तयार केले व प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली. संचालन छबू समरीत व आभार भारती व्यास यांनी केले.