भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक : अपक्ष व शिवसेनेच्या मतांवर नजर, निवडणूक चुरशीची होणारभंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांनी बुधवारला दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला. नामांकन दाखल करण्यापूर्वी लक्ष्मी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र जैन म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत सदस्य आणि सहयोगी सदस्यांची एकजुट आहे. या निवडणुकीत आपण बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास आहे. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी आमदार दिलीप बनसोड, भंडारा राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, गोंदिया राकाँचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सुनिल फुंडे, जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, भंडाराचे नगराध्यक्ष बाबूराव बागडे, तुमसरचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, पवनीच्या नगराध्यक्ष रजनी मोटघरे, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, नगरसेवक महेंद्र गडकरी, भगवान बावनकर, रुबी चढ्ढा, धनराज साठवणे, निखील जैन, मुन्ना जैन, नरेश माहेश्वरी, विलास काटेखाये, लवली वोरा, शैलेश वासनिक, अविनाश जैयस्वाल, नरेश कुंभारे, जिब्राईल पठाण, गोपीचंद थवानी, अविनाश ब्राम्हणकर, विजय डेकाटे, जनकराज गुप्ता, गंगाधर परशुरामकर, राजू व्यास, मकसूद खान, माणिक गायधने, सुनिल साखरकर, मधुकर चौधरी, सुमेध सुरेखा जनबंधू, कैलाश नशिने, शिव शर्मा, अशोक सहारे, अशोक गुप्ता, लखन बहेलिया, राहुल दवे, भैयू चौबे, हरी त्रिवेदी, चंचल चौबे, कैलाश पटले, सतीश देशमुख, दिनेश अग्रवाल, श्रीकांत वैरागडे, मकसुद पटेल, शैजादा खान, हेमंत महाकाळकर, राम गाजीमवार, स्वप्नील नशिने, नरेंद्र बुरडे, परवेज पटेल, नितीन तुमाने, राजू हाजी सलाम, विजय खेडीकर, पंकज ठवकर, शेखर गभणे, धनंजय सपकाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)९ उमेदवारांचे १३ नामांकन दाखलउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नऊ उमेदवारांचे १३ नामांकन दाखल झाले आहे. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी ३ नामांकन अर्ज, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र हिरालाल जैन यांनी ३ नामांकन अर्ज, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.परिणय रमेश फुके, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निखिल राजेंद्र जैन यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. याशिवाय अपक्ष विष्णुकुमार गणेशलाल अग्रवाल, अमित अनिलकुमार जैन, देवेंद्र राधेश्याम तिवारी, अरूणकुमार शिवकुमार दुबे, नितीश नरेशचंद्र शहा यांनी नामांकन दाखल केले आहे, असे ९ उमेदवारांचे १३ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.तिन्ही बलाढ्य उमेदवारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे रिंगणातील तिन्ही उमेदवार बलाढ्य आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू आहे. अपक्ष आणि शिवसेनेची अधिकाधिक मते खेचण्याकडे तिन्ही उमेदवारांनी भर दिला आहे.
राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांचे नामांकन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2016 12:37 AM