शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नवसमाज निर्मितीसाठी पुढाकार गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:42 PM

महिलांनी कुणावरही निर्भर न राहता स्वत:च्या विकासासाठी स्वत:च प्रयत्न करावे. महिलांकडे असलेल्या सृजनशीलतेचा वापर करुन नवसमाज निर्मितीच्या कार्यात हातभार लावावे असे प्रतिपादन जिल्हा परीषदच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले.

ठळक मुद्देमंजुषा ठवकर : जिजाऊ ब्रिगेडतर्फे तुमसर येथे जिल्हास्तरीय महिला परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महिलांनी कुणावरही निर्भर न राहता स्वत:च्या विकासासाठी स्वत:च प्रयत्न करावे. महिलांकडे असलेल्या सृजनशीलतेचा वापर करुन नवसमाज निर्मितीच्या कार्यात हातभार लावावे असे प्रतिपादन जिल्हा परीषदच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले.आधुनिक शिक्षणाच्या युगात महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली असली तरी महिलाविषयक हक्क व सुरक्षा विषयक कायद्यापासून त्या आजही दूर आहेत. तसेच सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढावा, या हेतुने जिजाऊ ब्रिगेड भंडारा तर्फे तुमसर येथे जिल्हास्तरीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या विभागिय अध्यक्षा सुनिता जिचकार होत्या. यावेळी मार्गदर्शक म्हणून राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक अ‍ॅड. वैशाली केळकर, डॉ. मनीषा म्हैसकर, श्रीकांत बरिंगे उपस्थित होते.सुनिता जिचकार म्हणाल्या, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांचे वैचारिक सक्षमीकरण करुन, धार्मिक गुलामीतून मुक्त करण्याचे प्रयत्न केल्या जात आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याची माहिती देऊन, ढोंगी बुवाबाजी पासून दूर राहावे. अ‍ॅड. वैशाली केळकर यांनी महिलांचे हक्क आणि सरंक्षण विषयक कायद्याविषयी मार्गदर्शन केले.श्रीकांत बरिंगे यांनी महिलांनी वैज्ञानिक विचार स्विकारावा, धार्मिक कर्मकांडात न गुरफटता स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याकरिता, जिजाऊ, सवित्री, रमाई, अहिल्याताई होळकर यांचे कार्य समोर ठेवून विविध क्षेत्रात कार्य करावे, जिजाऊंनी जसे शिवबाला घडविले तसेच अन्याय अत्याचारा विरुद्ध लढणारा आधुनिक शिवबा घडवावा, असे प्रतिपादन केले.या परिषदेला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल भुसारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे, कुसुम कांबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे, मुख्याध्यापिका प्रीति पडोळे, रेखा कोंडेवार, शांता बावनकर, पंचायत समिती सभापती रोशना नारनवरे, पंकज घाटे, राहुल डोंगरे, चंद्रकांत लांजेवार उपस्थित होते.परिषदेत महिलांकरिता प्रबोधनपर कार्यक्रमा व्यतिरिक्त सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोण निर्माण करणारे नृत्य, क्रांतिकारी गित व लावणी सादर करण्यात आले. या कार्यक्रमांचा अनेकांनी लाभ घेतला.प्रस्ताविक जिजाऊ ब्रिगेडचे प्रतिमा लांडगे यांनी केले. संचालन नीतू घटारे व सुलभा हटवार यांनी तर, आभार प्रदर्शन हिरा बोन्द्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रीती भोयर, सुगंधा डोंगरे, शितल टांगले, अंजली उताणे, रत्नमाला मने, कल्पना चामट, स्मिता येवले, उमा काळे, हिरण्यमयी साखरवाडे, सुनिता टेंभूर्णे, ललिता शेंडे, डॉ. प्रियदर्शनी सहारे, रुपाली खराबे, शालिनी बागडे, सिमा झंझाड, स्नेहल घाटे, रुपाली भुरे, नेमिता राहटे, बाली सार्वे, कल्याणी चोपकर, चंदा ढेंगे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.