मंजुषा ठवकर यांचे प्रतिपादन : दिव्यांगांचे ग्रीष्मकालीन शिबिरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : समाजाने दुर्लक्षित केलेल्या बालकांना जगण्याची नवी उमेद मिळावी यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यांच्या उत्थानासाठी पंचायत समितीस्तरावर आर्थिक तदतूद करण्यासाठी पुढाकार घेवू, असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. सर्व शिक्षा अभियान दिव्यांग समावेशीत शिक्षण गटसाधन केंद्र पंचायत समिती भंडाराच्या वतीने घेण्यात आलेल्या दिव्यांग बालकांचे ग्रिष्मकालीन शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी मोहन चोले, डायटचे प्राचार्य अभयसिंह परिहार, गटशिक्षणाधिकारी व्ही.पी. चरपे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. राठोड, खिल्लोत्तमा टेंभुरकर, रेवाराम टेंभुरकर, मुकेश बन्सोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ठवकर यांनी, पंचायत समितीस्तरावर अपंगांसाठी तीन टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीचा लाभ दिव्यांगांना देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. घेण्यात आलेले दिव्यांगांचे शिबिर खरोखरोच वाखान्याजोगे आहे. या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांच्यातील न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल.लोकसहभाग व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हे शिबिर दरवर्षी राबविता यावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून पुढाकार घेण्याचा मनोदय त्यांनी यावेळेस व्यक्त केला.यावेळी अभयसिंग परिहार, मोहन चोले आदींनी मार्गदर्शन केले. या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना योगा, म्युजिकल योगा, संगीत, वादन, नृत्य, आर्ट अॅन्ड क्रॉफ्ट स्पिच थेरपी, फिजीओ थेरपी, क्रीडा, व्यक्तीक कौशल्य, सामाजिक कौशल्य, व्यवसायीक कौशल्य, संगणक प्रशिक्षण, पालक समुपदेशनाचे धडे देण्यात आले. या शिबिरात सुमारे ५७ दिव्यांगांनी सहभाग घेतला होता. दिव्यांगांना चंद्रप्रभा वडे, विना मलेवार, संगीता देशमुख, शिल्पा वलके, गोळघाटे, सुधीर भोपे, ज्योत्सना बोंबार्डे, संघमित्रा रामटेके आदींनी प्रशिक्षण दिले.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज
By admin | Published: June 18, 2017 12:20 AM