शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

स्त्री शक्ती जागृत करण्याची गरज

By admin | Published: March 14, 2016 12:30 AM

महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लघु गृहउद्योग, स्त्री स्वत:च्या कर्तुत्वाने कुटुंबाची ...

पवनीत मेळावा : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन पवनी : महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लघु गृहउद्योग, स्त्री स्वत:च्या कर्तुत्वाने कुटुंबाची व पर्यायाने देशाची प्रगती करु शकते तसेच उद्योगपतीला सुध्दा कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे स्त्री शक्त्ीचा वापर कसा करावा हे समजाने ठरवावे. मात्र बदललेल्या परिस्थितीत स्त्री शक्त्ी जागृत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.महिला व बालकल्याण समिती नगरपरिषदतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न.प. अध्यक्ष रजनी मोटघरे यांनी भूषविले. न.प. उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती पुष्पा भुरे, महिला व बालविकास अधिकारी रवींद्र चव्हाण विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक माया खापर्डे, सुरेखा जनबंधू, हिरा मानापुरे, मसुद खॉ मेहबुब खॉ, समाजसेवीका सुनंदा मुंडले, महिला बाल कल्याण समिती सभापती वनिता सयाम तसेच मुख्याधिकारी नवनीत कोर (भा.प्र.से) माजी नगरसेवक रत्नमाला रामटेके, अशोक पारधी, ब्रह्मदास बागडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर यांनी महिलांनी सक्षम होण्यासाठी न्युनगंड दूर करावा व शासकीय योजनांचा कायदा घेवून व्यवसाय करावा असे आवाहन केले. अध्यक्षा रजनी मोटघरे यांनी महिला सक्षम आहेत पंरतू पुरुषप्रधान संस्कृतीमुळे त्यांना अबला समजण्यात येते व स्त्री उपभोग वस्तू असल्याचे मानल्या जाते. हा विचार बदलण्याची गरज असल्याने महिलांनी स्वहितासाठी पुढाकार घ्यावा असे विचार व्यक्त केले. सुनंदा मुंडले, हिरा मानापुरे व रवींद्र चव्हाण यानी समयोचित मत व्यक्त केले. १३ महिला बचत गटांना फिरते भांडवल म्हणून प्रत्येकी १० हजार रुपयाचा धनादेश वितरीत करण्यात आला. बचत गटांतर्गत उत्पादीत वस्तूची प्रदर्शनी लावण्यात आलेली होती. प्रास्ताविक सहा. प्रकल्प अधिकारी सरिता शेंडे यांनी केले. संचालन व आभार मुख्याध्यापिका पुष्पा बागडे यांनी केले. समारोपप्रसंगी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)