लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : दंडार महोत्सवाच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील लोकसंस्कृती जिवंत ठेवण्याचे काम महत्त्वपूर्ण असून अनेक वर्षांपासून सांस्कृतिक वारसा जोपासला जात आहे. त्याला शासनाकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मंडई व दंडार हा गावातील मोठा उत्सव असतो. ही प्रथा व परंपरा टिकवून ठेवली जात आहे. लाखनी येथे सतत २७ वर्षापासून जलसा उत्सव आयोजित करुन दंडार लोककलेला प्रोत्साहन देत असतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.स्थानिक आठवडी बाजार परिसरात नगरपंचायत लाखनी व सावरी, मुरमाडी ग्रामपंचायतच्या सहकार्याने जलसा उत्सव व दंडार स्पर्धेचे आयोजन शनिवारला करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती शिवराम गिऱ्हेपुंजे उपस्थित होते. अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, आकाश कोरे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जि.प. माजी सदस्य पप्पु गिऱ्हेपुंजे, प्राचार्य धनंजय तिरपुडे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष घनश्यामपाटील खेडीकर, नगराध्यक्ष ज्योती निखाडे, नगरसेवक भोला उईके, सुरेखा निर्वाण, पचांयत समिती सभापती खुशाल गिदमारे, मध्यवर्ती बँकेचे संचालन विलास वाघाये, विनोद भुते, विठोबा कांबळे, भिकाराम बागडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी दंडार मंडळानी लोककला दाखवुन लोकांचे मनोरंजन केले. खासदार कुकडे यांनी मार्गदर्शनपर भाषणात दंडार उत्सवाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आयोजक अनिल निर्वाण, प्रमोद फाये व लाखनी येथील नागरिकांंनी केले.सरकारवर कडाडलेप्रफुल पटेल म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे. धानाला बोनस दिला नाही. दीडपट हमी भाव देण्याचे गाजर दाखविले. भाजपा सरकार सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करणारी आहे. आमच्या सरकारने भेलची मुहूर्तमेढ रोवली पण भाजप सरकारने भेल अद्यापही सुरु केले नाही.
लोकसंस्कृतीला प्रोत्साहनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 9:46 PM
दंडार महोत्सवाच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील लोकसंस्कृती जिवंत ठेवण्याचे काम महत्त्वपूर्ण असून अनेक वर्षांपासून सांस्कृतिक वारसा जोपासला जात आहे. त्याला शासनाकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मंडई व दंडार हा गावातील मोठा उत्सव असतो. ही प्रथा व परंपरा टिकवून ठेवली जात आहे. लाखनी येथे सतत २७ वर्षापासून जलसा उत्सव आयोजित करुन दंडार लोककलेला प्रोत्साहन देत असतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : लाखनी येथे जलसा उत्साहात