राहूल डोंगरे : लेंडेझरी येथे मोबाईल कायदेविषयक साक्षरता शिबिरतुमसर : अंधश्रद्धा ही आधुनिक युगात समाजाला लागलेली कीड आहे. अंधश्रद्धेमुळे समाजाची अधोगती होत आहे. अनिष्ट रूढी, परंपरा, दैवधर्म, भूतपिशाचामध्ये समाज गुरफुटलेला दिसून येतो. विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाने जगाचा कायापालट केला हे सत्य असून सुद्धा समाज अंधश्रद्धेला बळी पडत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांची चिकित्सक वृत्ती वाढीस लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी केले.लेंडेझरी येथे कायदेविषयक साक्षरता शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, जादुटोना विरोधी कायदा विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुमसर न्यायालयाचे न्यायाधीश पाटील होते. अतिथी म्हणून अॅड. एस.के. सक्सेना, अॅड.डी.पी. रावलानी, अॅड.डी.एम. गहाणे, अॅड. राजेश राहुल, अॅड.रावलानी उपस्थित होते. याप्रसंगी अॅड. डी.पी. रावलानी यांनी मध्यस्थी व मुलभूत कर्तव्ये या विषयावर विचार मांडले. संचालन अॅड. राजेश राहूल यांनी केले. शिबिरात लेंडेझरी परीसरातील महिला उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज
By admin | Published: April 09, 2017 12:29 AM