एनपीएस खात्याची मासिक कपात सुरू करण्यापूर्वी डीसीपीएस खात्यात जमा असलेली रक्कम सुरुवातीची ठेव म्हणून जमा करण्यात येणार आहे किंवा कसे, पेंशन फंड मॅनेजर व गुंतवणूक प्रकार निवडण्याचे अधिकार खातेधारकांचा असावा, योजनेत रूपांतर झाल्यानंतर कर्मचारी मृत्यू पावला, तर कुटुंबीयांना कोणते लाभ मिळणार आहेत, याचे लेखी मार्गदर्शन मिळावे, खातेधारकांचे खात्यावर शासन हिस्सा व व्याज नियमित जमा करण्याची तरतूद करण्यात यावी, १ एप्रिल, २०२०ची शिल्लक रक्कम असलेली पावती मिळावी, राष्ट्रीय पेंशन योजनेत असलेली विश्वस्त बँक निवडण्याचे अधिकार कर्मचारी म्हणून खातेधारकांना असावे, या संदर्भात सर्व माहिती सुस्पष्ट शब्द स्वरूपात प्रत्येक खातेधारकांना मिळावी, या आशयाचे निवेदन पंचायत समिती शिक्षण विभागाकडे जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मडावी यांचे नेतृत्वात देण्यात आले. यावेळी ५० शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
एनपीएस खाते उघडण्यासाठी मार्गदर्शनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:35 AM