लोकमत न्यूज नेटवर्कवरठी: अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकाराची पायमल्ली होत असेल तर संविधानाच्या कायद्यातील तरतुदीनुसार हक्क मिळू शकतात. कायद्याने अधिकार व हक्क सुरक्षित राहू शकतात. कर्तव्याची जाणीव ठेवून वागलो तर अधिकराची पायमल्ली होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने अधिकार मागताना मानवी मूल्याचे जतन करण्यासाठी कर्तव्य पाळणे गरजेचे आहे. मानवी प्रवृत्तीतील राक्षस जागा झाला की सर्व घोळ निर्माण होतो. मानवी प्रवृत्तीतील राक्षस केव्हा जागा होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे. म्हणून सभोवताल घडणाºया घटनांपासून बचावासाठी अखंड सावधान असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय वरठीच्यावतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले, आजूबाजूला घडणाºया अनेक अनुचित घटना या आपल्या परिचितांकडून केल्या जातात. लैगिक अत्याचारासारख्या घडणाºया सर्वाधिक घटना या परिचितांमार्फत झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. लैंगिक अत्याचारापासून सावधानता म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे नसून त्याबाबत सजग राहणे आहे. सुरक्षेकरिता नियमित सावध राहणे आहे.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश -१ आर पी पांडे, जिल्हा न्यायाधीश -२ एन. व्ही. जिवने, जिल्हा न्यायाधीश -३ एस. बी. भन्साली, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य, सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) एस. के. साबळे, सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) डी. एम. धालीवाल, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) पी. बी. येर्लेकर, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) एस. एच राठी, चौथे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) पी. डी. मेंढे, नवनिर्माण संस्थेचे सचिव अॅड. कैलास भुरे, अध्यक्ष मिलिंद मदनकर उपस्थित होते.सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना अनेक उदाहरण देऊन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबीची माहिती दिली. जीवनात अनेक रहस्यमय घडामोडी घडतात, पण त्यावर मात करणे हे शेवटी आपल्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या युगातील मांजर आडवी गेल्याच्या म्हणजे आपण आपल्या सभोवताल असणाºया सुविधांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास आयुष्यात अडथळे येतात असे सांगितले. म्हणून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक प्रमाणात करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. संचालन प्रा.आशिष बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा अविनाश नवखरे , प्रा रजनी भुरे, प्रा मधुकर गोमासे, संगीता वखालकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे डी आर. भुरे उपस्थित होते.
नेहमी सावध राहाणे ही काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:28 PM
अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकाराची पायमल्ली होत असेल तर संविधानाच्या कायद्यातील तरतुदीनुसार हक्क मिळू शकतात.
ठळक मुद्देसंजय देशमुख यांचे प्रतिपादन : वरठीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर