आॅनलाईन लोकमतलाखनी : बहुजनांचे राज्य निर्माण करायचे असेल तर ओबीसी, अनुसूचित जनजाती, भटके आदी नागरीकांनी आता एकत्रित आल्याशिवाय बहुजनांचे राज्य निर्माण होणे शक्य नाही. बहुजनांची सत्ता आली पाहिजे. त्यासाठी तन, मन, धनाने शेवटपर्यंत लढणार आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.एक आशा फाऊंडेशन व नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन मुरमाडी, सावरी, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ विद्यालयाच्या पटांगणावर संविधान दिन, बिरसा मुंडा जयंती आणि भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुख्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रजनी आत्राम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाणिकारी सी.एम. बागडे, हरीदास बोरकर, सुरेंद्र बन्सोड, अमोल कांबळे, मुकेश धुर्वे, शालिकराम बागडे, सरपंच सुनीता भालेराव, रजनी पडोळे, अमित भंडारे आदी उपस्थित होते. खासदार पटोले म्हणाले, यावेळी आयोजकांनी केलेल्या कार्यक्रमांची प्रशंसा करुन असे आयोजन होणे आवश्यक आहे. यातून बहुजन बांधवांना इतीहासाचे स्मरण होऊन त्यातून प्रेरणा मिळते. सी.एम. बागडे म्हणाले, संविधान भारत देशाचा श्वास आहे. आभार प्रदर्शन अश्विनी भिवगडे यांनी केले.तत्पुर्वी बिरसा मुंडा जयंती आणि संविधान दिवसाच्या पर्वावर भीम मेळाव्याच्या पृष्ठभूमिवर सकाळी पंचशील तसेच आदिवासी लोकांच्या सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. पंचशीलध्वजाचे ध्वजारोहण सी.एम. बागडे तर, आदिवासी बांधवांच्या सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण पंचायत समिती सभापती रजनी आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी बांधवांची त्यांच्या परंपरेनुसार ध्वजाची पूजा संस्थेद्वारे करण्यात आली.त्रिशरण व पंचशील आणि बुद्ध, धम्म संघ वंदना भदंत आनंद यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सकाळ सत्रातील कार्यक्रमाचा शेवट 'हे मानव तू मुखसे बोल, बुद्धम सरणमं गच्छामी' ने करण्यात आली. आदिवासी पध्दतीनुसार पूजा भुमक सुभाष धुर्वे आणि कैलास उईके यांनी पार पाडली. त्यावेळी रजनी आत्राम या प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी सुरज बागडे, हरीदास बोरकर, इंदू बागडे, सी.एम. बागडे, मुकेश धुर्वे, आशिष गणवीर, अमित भंडारे, शंकर उईके, कैलास परतेकी आदी उपस्थित होते.मुख्य उद्घाटन कार्यक्रमानंतर रात्री आदिवासी विद्यालय माडगी येथील मुलींनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर झाले. आदिवासी नृत्य आकषर्णाचे केंद्र ठरले. यावेळी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेणाºया मुलींना स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले.संगीतकार भुमेश गवई यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला हजारो नागरीकांनी हजेरी लावली होती कार्यक्रमासाठी डॉ. गुणवंत इलमकार, धीरज बागडे, जयंत जांभुळकर, विनय रामटेके, मायकल वैद्य, नवनित बागडे, संजय पेंदाम, अजीत भंडारी, सुनिल रामटेके, मेघराज धुर्वे, रजत भालाधरे, भूषण गजभिये, मंगेश गेडाम आदींनी सहकार्य केले.युवकांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी असल्यामुळे युवावर्ग बहुजनांच्या एकत्रिकरणासाठी एकत्रीत आल्याचे दिसून आले. या युवकांमध्ये नाना पटोले यांनी जोश भरला. अनुसूचित जाती, जमाती यांच्यासह ओबीसी बांधवांनीही एकत्रित आल्यास त्यांच्या विकासासाठी मोठा हातभार लागू शकतो. आशा फाऊंडेशन व नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन मुरमाडी, सावरी, लाखनीच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून असे कार्यक्रम गावोगावी व्हावे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.