शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 1:04 AM

आज महिला सर्व क्षेत्रात पोहचल्या आहेत. चूल आणि मूल सांभाळीत तिने अनेक क्षेत्रातही आपले पाय घट्ट रोवले

भंडारा : आज महिला सर्व क्षेत्रात पोहचल्या आहेत. चूल आणि मूल सांभाळीत तिने अनेक क्षेत्रातही आपले पाय घट्ट रोवले आहेत. स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शालिनी देशकर यांनी केले.प्रगती महिला समाज, भंडारा द्वारा संचालित प्रगती महिला कला महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र, भंडारा प्रगती महिला समुपदेशन केंद्र तुमसर आणि भंडारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केले. प्रमुख वक्ता व मार्गदर्शन म्हणून प्रा. आरती देशपांडे, प्रा. वासंती सरदार उपस्थित होत्या. घरातील मांगल्य हे स्त्रीमुळेच आहे. महिलांनी सकारात्मक विचार करा. भरभरुन बोला, लिहा निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायला शिका. आपल्या संवेदना बोथट करु नका. दृष्टी आत्मसात करा आणि नात्यातील सुंदरता जपा, असे प्रतिपादन जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रा. आरती देशपांडे यांनी केले प्रा. वासंती सरदार यांनी मुलीनों तुम्ही उच्च शिक्षण घ्या आणि हुंडा घेणाऱ्यांशी लग्न करणार नाही असे ठामपणे आपल्या पालकांना सांगा. अंधश्रध्दाळू बनू नका, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रविंद्र चव्हाण यांनी मुलींना विविध शासकिय योजनांची माहिती देवून त्यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सहायक संचालक जिल्हा कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख बालाजी मरे यांनी गृहोद्योगातून महिला विकास कसा साधता येतो याबद्दलची माहिती सांगितली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त एसबीआय बँक अधिकारी उत्तमराव वाडेकर आणि जिल्हा अभियंता दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त एम. वाडेकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी वर्षभरात होणाऱ्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात महाविद्यालयाची बी. ए. प्रथम वर्षाची लक्ष्मी बावनउके हिने अश्वमेध महोत्सव नांदेड तसेच पश्चिम विभाग आंतरविद्यापिठ मुंबई येथे झालेल्या खो-खो खेळामध्ये नागपूर विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. तसेच सीबीएसई दहावीच्या परिक्षेमध्ये समिक्षा दुर्गाप्रसाद चौधरी हिने भंडारा जिल्ह्यातून द्वितीय व विदर्भातून तिसऱ्या क्रमांकानी उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.संचालन प्रा.डॉ. जयश्री संजय सातोकर यांनी केले उपस्थितांचे आभार महिला व बालविकास कार्यालयाच्या परिविक्षा अधिकारी आंबेडारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशांत देशकर, प्रा. डॉ. विजया लिमसे, प्रा. कल्पना निंबार्ते, डॉ. जी. एन. कळंबे, प्रा. शालिक राठोड, प्रा. डी. डी. चौधरी, प्रा. क्रिष्णा पासवान, प्रा. अंकोश चवरे, संजय वानखेडे, मनीष देशकर, मंजुषा चव्हाण, सुकेशिनी कुंभलकर व विद्यार्थीनींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)