लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : जागतिक पर्यावरणाची होत असलेली ºहास यामुळे वातावरणात विविध बदल घडून येत आहे. या बदलामुळे लहानपणापासुन बालकांच्या शरीरात विपरीत परिणाम घडून येत आहे. वयस्कर होताच त्यात सुधारणा करण्यास मोठी अडचण जात आहे. कौटुंबिक जीवन उध्वस्त होते. याला टाळण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. परिणामी आरोग्यदायी जीवन उत्तम राहतो, असे प्रतिपादन महाप्रबंधक ए. षणमुग्म यांनी केले.आयुध निर्माणी भंडारा येथील स्थानिक शासकीय कंत्राटदार यांच्या वतीने आयुध निर्माणी वसाहतीमधील महात्मा गांधी उद्यानासमोरील पटांगणात वृक्षारोपणाचे उद्घाटन प्रसगी आयुध निर्माणी भंडाराचे महाप्रबंधक बोलत होते. यावेळी अतिरिक्त महाप्रबंधक डॉ. प्रविण महाजन, अप्पर महाप्रबंधक एम. राजकुमार, डॉ. मुंड, डॉ. बंसोड, नेगी, रेड्डी, निशिद, दिवेदी, रामगैन सिंग, घोष, अनुप दिवेदी, बिसनोई आदी उपस्थित होते.डॉ. प्रविण महाजन म्हणाले की, याठिकाणी प्रथमत: वृक्षारोपणाचा कार्यक्रम येथील आयुध निर्माणी कंत्राटदारानी घेतलेला आहे. तो वाखाण्याजोगा आहे. याला जनतेनी योग्य प्रतिसाद देऊन लोकपयोगी कार्यास हातभार लावणे अगत्याचे आहे. एकमेकांच्या सहकार्यानेच वसाहतीमध्ये नवचैत्यन्याची बगीचा फुलून निघेल. एम. राजकुमार म्हणाले, आज हिमालय टेकडी कोसळत आहे. औद्योगिक क्रांतीसोबत वृक्षसंवर्धनाची क्रांती घडविण्याची गरज आहे. प्रौढ मनातील विचार आजच्या तरुणाईमध्ये आत्मसात करुन पुढील धोका टाळावा.याप्रसंगी स्थानिक कंत्राटदारातर्फे आयुध निर्माण फॅक्ट्री स्कुल येथील महात्मा गांधी उद्यानासमोरील प्रांगणात, बाल शिशु क्रीडांगण, केंद्रीय विद्यालय परिसर, रिकरेशन क्लब येथे आवळा, बदाम, कवट, सिताफळ, बेल, गुलमोहर आदी प्रजातींच्या फळांची व वनऔषधी वृक्षाचे रोपण करुन त्यांना लोखंडी कठडे लावण्यात आले.या वृक्षाांचे संगोपन करण्याचा संकल्प कंत्राटदारासह कर्मचाऱ्यांनी घेतला. संचालन व आभार सैय्यद इब्राईम यांनी केले.
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:23 PM
जागतिक पर्यावरणाची होत असलेली ºहास यामुळे वातावरणात विविध बदल घडून येत आहे. या बदलामुळे लहानपणापासुन बालकांच्या शरीरात विपरीत परिणाम घडून येत आहे. वयस्कर होताच त्यात सुधारणा करण्यास मोठी अडचण जात आहे. कौटुंबिक जीवन उध्वस्त होते. याला टाळण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. परिणामी आरोग्यदायी जीवन उत्तम राहतो, असे प्रतिपादन महाप्रबंधक ए. षणमुग्म यांनी केले.
ठळक मुद्देए. षणमुग्म : आयुध निर्माणी वसाहतीत वृक्षारोपण