दलाल यांचे प्रतिपादन : तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची सभातुमसर : नगरपरिषदेची पुन्हा सत्ता हस्तगत करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. कार्यकर्ताच पक्षाची ताकत आहे. त्यांच्या परिश्रमानेच पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांनी व्यक्त केले. तुमसर नगरपरिषद निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा दुर्गाप्रसाद सराफ अतिथिगृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले, पालिका गटनेता राजेश देशमुख, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, जिल्हा राकाँ महिला अध्यक्ष कल्याणी भुरे, तालुका अध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजकुमार माटे, किशोर चौधरी, पमा ठाकूर, उषा जावळे आदी उपस्थित होते.शहर राकांध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनी प्रास्ताविकेत नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेबाबत माहिती दिली. मधुकर कुकडे यांनी, नगरपरिषद कामाचा आढावा घेऊन नगरसेवकांनी प्रभागात सक्रिय राहून नागरिकांची कामे करुन संघटन मजबूत करण्याचा सल्ला दिला.याप्रसंगी धनंजय दलाल यांनी तुमसर नगरपरिषदेच्या विकास कामाची प्रशंसा केली. पुन्हा सत्ता काबीज करण्याकरिता कठोर परिश्रम घेण्याची गरज असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी विकासात्मक कामाची माहिती दिली. सभेत प्रत्येक प्रभागात राकाँ पक्षाचे प्रमुख, वॉर्ड प्रमुख, बुथ कमेटी तयार करणे, वॉर्ड कमेटी तयार करणे, बैठका घेऊन समस्या निराकरण करणे, शहराचा सर्वांगीण विकास करणे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेचे संचालन अंकुश ठाकुर तर आभार राजेश देशमुख यांनी मानले. सभेला निशिकांत पेठे, नगरसेवक सलाम तुरक, नगरसेविका विजया चोपकर, कविता साखरवाडे, चंदा धार्मिक, मीना गाढवे, भाग्यश्री निखाडे, सुता भोंडेकर, तिलक गजभिये, आफताब रिजवी, प्रवीण लांजेवार, संकेत गजभिये, नीतू शर्मा, पूनम मेश्राम, संजय लाखा, गुलशन बारसागडे, संजय चोपकर, शाम भैरम, महेश लिमजे, उपेंद्रसिंग चौहाण, मनोज मते, नागेश धार्मिक, गणेश गायधने, राजू धार्मीक, जयंत पडोळे, मोहन चारमोडे, राकेश लाखडे, रमेश गायधने, शैलेश साखरवाडे, आरजू नागदेवे, संजय गाढवे भोजराज येवले, विनोद कावळे, विजय पाटील, रामकृष्ण उकरे, भोजराज बुधे, परिक्षीत नायडू, निशिथ वर्मा, प्रदीप भुरे, दिलीप भोंडेकर, जयश्री मने, राधा मने, लीला शेंडे, सुशीला राऊत, सुमन टेकाम, ज्योती धावडेसह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
सत्तेसाठी कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची गरज
By admin | Published: May 30, 2016 1:01 AM