लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत शिक्षकांनी अनेकदा मोर्चे काढले, आंदोलन केले, चर्चा केल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या शिष्टमंडळाला आतापर्यंत केवळ आश्वासन दिले. मात्र, समस्या सोडविल्या नाही. त्यामुळे भावी पिढी घडविणाºया शिक्षकांची मानसिकता आता नकारात्मक होत असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात आज शिक्षणाधिकारी मोहन चोले यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या त्वरित सोडवाव्या अशी मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या कार्यामुळे गुणवत्ता विकासाचे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात भंडारा जिल्ह्याने मोठी प्रगती केली आहे. ही सर्व प्रगती जिल्ह्यातील शिक्षकांच्या सहकार्याने झालेली असतानाही त्यांच्या समस्यांकडे मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मागील अनेक वर्षांपासून या सर्व प्रलंबित समस्या निकाली निघाव्या यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. संघाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करीत त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी जि. प. प्रशासनापुढे मागण्या मांडल्या. वेळप्रसंगीा खासदार, आमदार व जिल्हा परिषद पदाधिकारी यांनाही निवेदन दिले. मात्र, शिष्टमंडळाला केवळ आश्वासनाचे गाजर देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे आता शिक्षकांची मानसिकता नकारात्मक बनत चालली असल्याचे भितीदायक चित्र दिसून येत आहे. शिक्षणाधिकारी मोहन चोले व अधीक्षक विनोद सोमकुवर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी राधेश्याम आमकर, सुधीर वाघमारे यांची उपस्थिती होती.या मागण्यांसाठी लढा सुरूपदावनत केलेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे कार्यशाळेतून केलेले आदेश जारी करावे, वरिष्ठ, निवड श्रेणी प्रकरण त्वरित निकाली काढण्यासाठी मुल्यमापन समितीची तात्काळ मंजुरी प्रदान करावी, आंतरजिल्हा बदलीने शाळेत रूजू झालेल्या शिक्षकांमुळे आधिच्या शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात येवू नये, साकोली तालुक्यातील २०१६ मध्ये केलेल्या बदल्या सार्वत्रिक बदल्यांमधील प्रशासकीय बदलीच्या ३० शिक्षकांचे थकित वेतन आॅनलाईन काढावे, शालेय पोषण आहार नविन धोरणानुसार शाळास्तरावर मुख्याध्यापकांना स्व:खर्चाने करावयाचे आहे. मात्र, पुर्वानुभव बघता याचा मार्ग जिल्हास्तरावर काढावा, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना औरंगाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढ थकबाकीसह द्यावी.
प्रलंबित मागण्यांमुळे शिक्षकांची नकारात्मक मानसिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:52 PM
जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत शिक्षकांनी अनेकदा मोर्चे काढले, आंदोलन केले, चर्चा केल्या.
ठळक मुद्देशिक्षणाधिकाºयांना निवेदन : अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून आश्वासनाचे गाजर