शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

मेंढपाळांना वनक्षेत्राधिकाºयांचा नाहक जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पशुसंवर्धनासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना जनहितार्थ राबविल्या जात असल्या तरी काही बेजबाबदार अधिकाºयांकडून त्या योग्य प्रकारे राबविल्या न गेल्यास सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अर्थपूर्ण व्यवहार करून शासनाच्या योजना पदरी पाडून घ्याव्या लागतात. यांचे ताजे उदाहरण म्हणजे अड्याळ वनक्षेत्रातील मेंढपाळांना चराई पासेस न मिळाल्याने ...

ठळक मुद्देशासन निर्णयाची पायमल्ली : चराईसाठी पावत्यांना टाळाटाळ, अड्याळ वनक्षेत्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पशुसंवर्धनासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना जनहितार्थ राबविल्या जात असल्या तरी काही बेजबाबदार अधिकाºयांकडून त्या योग्य प्रकारे राबविल्या न गेल्यास सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अर्थपूर्ण व्यवहार करून शासनाच्या योजना पदरी पाडून घ्याव्या लागतात. यांचे ताजे उदाहरण म्हणजे अड्याळ वनक्षेत्रातील मेंढपाळांना चराई पासेस न मिळाल्याने प्रत्यय येतो.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील काही गावात धनगर जमातीचे वास्तव्य आहे. त्यातील बरेच लोक मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात.शासन सुद्धा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय वाढावा यासाठी अनेक योजना व अनुदान देत असते. मात्र असणाºया पशुधनाला (मेंढ्या) चाºयाची सुद्धा गरज असते. मेंढी हा प्राणी साधारणत: बंदिस्त पाळला जात नाही. त्यामुळे त्याला चराईसाठी जंगलात व माळरानावर मेंढपाळ लोक घेऊन जातात. परंतु याकडे वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी धाक दपटशा करून आर्थिक वसुली करतात. अर्थपूर्ण व्यवहार न केल्यास मेंढ्यांना कोंडवाड्यात बंदिस्त केल्या जाते.त्यामुळे शासनाने शासन निर्णय क्रमांक एमएफपी २१०३/प्र.क्र.१३५/फ९ महसूल व वनविभाग मुंबई ३२ दि.६.५.२००८ च्या जीआर नुसार २१ वनविभागास मेंढी चराईसाठी काही प्रमाणात क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये बंदकुप व रोपवन क्षेत्र सोडून चराईसाठी पासेस देण्याचे निकष आहे.मात्र अड्याळ येथील वनक्षेत्राधिकारी यांनी नेरला, चिचाळ येथील मेंढपाळांनी वारंवार चराई पासेसची मागणी एक महिन्यापासून करून सुद्धा अद्यापही पासेस उपलब्ध करून दिल्या नाही. यासाठी मेंढपाळ वनक्षेत्र कार्यालय अड्याळ येथे वारंवार खेटे घालत आहेत. या संदर्भात प्रत्यक्ष लोकमतने संपर्क साधला असता हा जी आर मला माहित नाही.त्याचा मला अभ्यास करावा लागेल असे सांगून वेळ मारून नेली. मात्र आजमितीलाही सदर कार्यालयात धनगर बांधव पासेससाठी हेलपाट्या मारीत आहेत. मात्र नव्यानेच आलेले वनक्षेत्राधिकारी बेलखोडे म्हणतात की, बिना पासेसने जंगलात मेंढ्या नेल्यास तुम्हालाही व मेंढ्यांनाही अंदर करीन अशी धमकी दिल्याचे मेंढपाळांचे म्हणणे आहे.सदर जीआर नुसार यापूर्वी २०१६-१७ मध्ये चराई पावती प्रती मेंढी २० रुपये प्रमाणे पावती दिली. मात्र रुपये ५० घेतल्याचे मेंढपाळांचे म्हणणे आहे.भंडारा जिल्ह्यातीलच दवडीपार वनक्षेत्रामध्ये सत्र २०१७-१८ साठी चराई पावती १० रु. प्रती मेंढी प्रमाणे दिली आहे. तर जीआर एक जिल्हा एक पावती मध्ये मात्र रकमेची तफावत का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.शासनाच्या जीआरची माहिती नसणाºया आणि मेंढपाळाने जीआर उपलब्ध करून दिला असता तो मान्य न करता मेंढपाळांना त्रास देणाºया अधिकाºयावर संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य कारवाई करून तात्काळ चराई पासेस उपलब्ध करून देण्याची मागणी चिचाळ, नेरला येथील मेंढपाळ धनगर बांधवांनी केली आहे.