शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

नेरला उपसा सिंचनाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 10:11 PM

नेरला उपसा सिंचन जलदगतीने सुरु व्हावा म्हणून लोकनेत्यांनी यशस्वी प्रयत्न केले. परंतु ज्या गावाच्या हद्दीत हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपसा सिंचन प्रकल्प तयार झाले त्याच गावातील ग्रामस्थांना मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे. नेरला ग्रामस्थांनी ९० टक्के शेतजमीन सन २००० ला अधिग्रहीत करण्यात आली. परंतु अद्याप पुनर्वसन झालेले नाही परिणामी संतप्त झालेल्या नेरला ग्रामस्थांनी चक्क उपसा सिंचनाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देग्रामस्थांनी उचलला आक्रमक पवित्रा : पुनर्वसन आधी करा-मगच धरणात पाणी भरा

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : नेरला उपसा सिंचन जलदगतीने सुरु व्हावा म्हणून लोकनेत्यांनी यशस्वी प्रयत्न केले. परंतु ज्या गावाच्या हद्दीत हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपसा सिंचन प्रकल्प तयार झाले त्याच गावातील ग्रामस्थांना मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे. नेरला ग्रामस्थांनी ९० टक्के शेतजमीन सन २००० ला अधिग्रहीत करण्यात आली. परंतु अद्याप पुनर्वसन झालेले नाही परिणामी संतप्त झालेल्या नेरला ग्रामस्थांनी चक्क उपसा सिंचनाला कुलूप ठोकले.नेरला उपसा सिंचनाला कुलूप ठोकण्याची माहिती वाºयासारखी परिसरात पसरताच हजारो शेतकºयांचे ठोके वाढले यात चुक शासनाची की नेतला ग्रामस्थांची? मागील काळात जेव्हा नेरला उपसा सिंचनाचे कामकाज संथगतीने होत होते. परंतु एकाच वेळेस निवडणूक जवळ येताच काम एवढ्या गतीने सुरु झाले की रात्रंदिवस काम चालले. निमित्त होते नेरला उपसा सिंचनाच्या उद्घाटनाचे. गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला असून नेरला ग्रामस्थांची अंदाजे २०० ते ३०० एकर शेतजमीन पाण्याखाली आली.त्यामुळे लावलेले प्ीके गेलीच. परंतु पाणी गावाजवळ आल्याने मोठ्या प्रमाणात सरपटणाºया प्राण्यांचा हैदोस वाढला. त्यामुळे सुद्धा ग्रामस्थ चिंताजनक स्थितीत आहेत. नेरला ग्रामस्थांच्या मते गावठाणाचे अधिग्रहण करताना जाहीरनाम्याच्या दिवशी ग्रामपंचायत अभिलेखात नमूद असलेल्या एकुण १२३८ कुटुंबाचे रितसर पुनर्वसन करण्यात यावे, नेरला उपसा सिंचन करिता ज्यांच्या जमीनी गेल्या अशांना पॅकेज अंतर्गत पर्यायी जमीन व पुनर्वसन अनुदान द्यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन नेरला ग्रामस्थांनी दिले होते.नेरला ग्रामस्थांनी या आधी आपल्या समस्या कित्येकदा शासनदरबारी मांडल्या. नागपूर, मुंबई, दिल्लीपर्यंत मोर्चात गेले प्रश्न मांडले. अनेक मोठमोठ्या संबंधित विभाग अधिकार तथा लोकप्रतिनिधीकडे पण उपयोग काहीच झाला नसल्याची शोकांतिका यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे आता पर्याय राहिला नसल्याचेही शब्दात व्यक्त केले.लोकप्रतिनिधींना या नेरला गावाविषयीचे प्रश्न माहित नाही का? शासन तथा जिल्हा प्रशासन मग यांनाही माहित नाही का? नेरला ग्रामस्थांनी जे प्राप्त माहितीनुसार अड्याळ व परिसरातील शेतकरी याच नेरला उपसा सिंचनाच्या भरोश्यावर आहेत.परंतु नेरला उपसा सिंचन बंद केल्याच्या माहितीमुळे हजारो शेतकºयांमध्ये धडकी भरली आहे. शेतीला पाण्याची गरज आहे. त्यात एका पाण्याने शेतपीक जावू शकते. त्यामुळे जिल्हा पुनर्वसन अधिकारी व विभाग नेरला ग्रामवासीयांच्या कोणत्या मागण्या पूर्ण करतो याकडे हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.हा सर्व प्रकार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे होत आहे. गोसीखुर्द प्रकल्पात बाधीत झालेल्या शेतकऱ्यांचा विचार तात्काळ व्हायला पाहिजे.-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार.नेरला उपसा सिंचनाच्या उद्घाटन वेळीच ग्रामस्थांनी अटकाव, मोर्चा काढला असता परंतु त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन उद्घाटन केले होते.-अनिल कोदाणे, सरपंच नेरला.नेरला या गावाचा जेएमआर करून तात्काळ पुनर्वसन तथा नवीन गावठाण देण्यात यावा.-संजय तळेकर, नेरला.गावाचे सर्वेक्षण झाले त्यांची शेतजमीन गेली आहे. गावठाणबाधीत होत नसल्यामुळे स्वच्छा पुनर्वसन होणार. त्यासाठी कार्यकारी यंत्रणा पॅकेज सुद्धा देणार असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळाली.-अभिमन्यू गोधवड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, भंडारा.