मल्चिंग, ड्रीपचा आधार घेत त्यांनी सरी वरंभा पद्धतीने पिकाची लागवड केली. पिकाला किडींचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक झाडाजवळ क्राप कव्हर लावले. अशा पद्धतीने त्यांची शेती सुरू आहे. यावर्षी त्यांनी एक एकरात कारले पिकाची लागवड केली. भंडारा येथील बीटीबी सब्जीमंडीच्या मार्गदर्शनात त्यांनी बाजारपेठेची निवड केली. एक एकर शेतातून आतापर्यंत त्यांना १५ टन कारल्याचे उत्पन्न झाले आहे. खर्च वजा जाता दोन लाख रुपयाचा त्यांना निव्वळ नफा झाला आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी गणपती दांडेगावकर, कृषी पर्यवेक्षक अशोक जिभकाटे, कृषी सहायक अरविंद धांडे, बीटीबी अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी मार्गदर्शन केले.
बॉक्स
नव्या तंत्रज्ञानाने शेती फायद्याची
संजय झलके आपल्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. नव्या तंत्रज्ञानाने व कृषी विभागाच्या सल्ल्याने शेती केली तर निश्चितच चांगले उत्पन्न होते, असे ते सांगतात. कीडरोग नियंत्रण महत्त्वाचे असून शेणखत, जमिनीची पोषकता वाढविते. त्यामुळे रोग दूर राहतात, असे संजय झलके सांगतात.
कोट
कारले पिकातून आपण समृद्धीचा मार्ग शोधला आहे. भंडारा येथील बीटीबी मार्केटमध्ये कारल्याला सरासरी ३० ते ३५ रुपये किलो दर मिळाला. शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाकडे वळावे.
- संजय झलके, प्रयोगशील शेतकरी.