शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सामान्य रूग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 1:32 AM

दोन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली.

भंडारा येथील घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणीभंडारा : दोन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याबाबत मृत बाळाचे वडील देवानंद राजहंस लोणारे रा.दिघोरी (मोठी) यांनी आरोग्य उपसंचालकांसह संबंधितांकडे तक्रार करून दोषींविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.दि. २५ डिसेंबरला देवानंद लोणारे यांची पत्नी निलीमा यांना प्रसूतीकरिता भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी १० वाजता भरती करण्यात आले. जननी सुरक्षा योजनेंतर्गत दिघोरी ते भंडारा पर्यंत वाहन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याच दिवशी दुपारी ४.१५ च्या सुमारास नीलिमा यांनी बाळाला जन्म दिला. जन्माच्या वेळी बाळाचे वजन ३.५ किलोग्रॅम होते. बाळ जन्मल्यानंतर निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दि. २७ ला सायंकाळी ७ वाजताच्यादरम्यान बाळाची तब्येत बिघडली. त्यावेळी वॉर्ड नं. ११ मध्ये कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला सांगण्यात आले. यावेळी बाळाला आपातकालीन विभागामध्ये घेऊन जाण्याची सूचना देण्यात आली. परंतु बालरोगतज्ज्ञाला बोलाविण्यात आले नाही. सायंकाळी ७.३० च्या सुमारास आपातकालीन विभागामध्ये बाळाला घेऊन गेले असता यावेळी डॉ.सुयोग कांबळे यांनी बाळाला न तपासता, बाळ चांगला आहे, तंदुरुस्त आहे असे सांगितले. परंतु यावेळी बाळ जोरजोराने रडत होता व झटके देत होता. रात्री १२ वाजता पुन्हा परिचारिकेला सांगितले असता त्यावेळीही बालरोग तज्ज्ञांना बोलाविण्यात आले नाही. २८ डिसेंबरला पहाटे ५ वाजता आपातकालीन विभागात बाळाला नेण्यात आले. आयसीयुमध्ये भरती करण्यात आले. परंतु बाळावर कोणत्याच प्रकारचे उपचार करण्यात आले नाही असा आरोप देवानंद लोणारे यांनी केला आहे. दरम्यान सकाळी ९ च्या सुमारास डॉ.कल्याणी निंबार्ते यांनी बाळाला तपासले असता मृत घोषित केले. तसेच दुपारी १ वाजता मृत बाळाचे शवविच्छेदन न करता मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आले. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा जीव गेला. त्यामुळे दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देवानंद लोणारे यांनी तक्रारीतून केली आहे. (प्रतिनिधी)