लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चान्ना बिट क्रमांक-२ मधील कनेरी (दगडी) गावाजवळ नीलगाईला वेळेवर उपचार न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अड्याळ वनपरिक्षेत्राचे कार्यक्षेत्रात घनदाट जंगल आहे. दक्षीणेकडे उमरेड कºहांडला अभयारण्य तर उत्तरेस कोका वन्यजीव अभयारण्य असल्याने हिंस्त्र श्वापदांसह तृणभक्षी प्राण्यांचेही या वनपरिक्षेत्रातील जंगलात वास्तव्य आहे. २१ जुन रोजी चान्ना बिट क्रमांक २ मध्ये कनेरी/दगडी गावाजळ एक आजारी निलगाय गावकऱ्यांना दिसुन आली. याबाबत बिटरक्षक डोंगरे यांनी क्षेत्र सहायक डब्ल्यू. आर खान, वनपरिक्षेत्र अधिकारी बेलखोडे यांना भ्रमणध्वनीवरुन सुचना दिली.तब्बल पाच तासाने वनकर्मचारी वैद्यकिय अधिकाºयांसह घटनास्थळी पोहचले. निलगायीवर उपचार सुरु करण्यापुर्वी वैद्यकिय अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीवर फोन आल्याने वार्तालाप सुरु झाला. यात बराच वेळ निघून गेल्याने नीलगायीचा तडफडून मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावर उपस्थित गावकºयांनी घडलेला प्रसंग सांगितला.वनकर्मचारी व अधिकाºयांना त्यांचे मुख्यालयासह वास्तव्य करता यावे याकरिता शासनाकडून निवासाची सोय करण्यात आली असुन सुसज्ज इमारती आहेत.मात्र तालुका व जिल्हा मुख्यालयातुन अपडावुन करीत असतात.वन संरक्षण आणि वन्य प्राण्यांची निगा राखण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आजारपणामुळे मृत्यू आणि शिकारीच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येते.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. असाच प्रकार आठवडाभरापुर्वी गराडा तलावातही घडल्याचे उघडकीला आले होते. येथेही आजारी निलगाय मृत्युमुखी पडली होती. तिला तेथेच पुरण्यात आले. तर कनेरी/दगडी येथे मृत्यू पावलेल्या निलगायीला पेंढरी वनरक्षकाच्या सदनिकांमागे असलेल्या जागेत पुरण्यात आले. आठवड्याभरात दोन नीलगायीचा मृत्यू म्हणजेच तृणभक्षी प्राणांवर आजाराची साथ तर आली नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे.
उपचाराअभावी नीलगाईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:37 AM
लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चान्ना बिट क्रमांक-२ मधील कनेरी (दगडी) गावाजवळ नीलगाईला वेळेवर उपचार न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देचान्ना बिट क्रमांक-२ मधील घटना : पाच तासानंतर आले वनाधिकारी