भंडारा : १७ सदस्यीय मोहाडी, लाखनी व लाखांदूर या तीन नगरपंचायतीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारला पार पडली. आरक्षणामुळे या तिन्ही नगरपंचायतीवर महिलाराज आले आहे. विजयाची घोषणा झाल्यानंतर शहरातून गुलाल उधळत ढोलताशांच्या निनादात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मोहाडीत काँग्रेसचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, लाखांदुरात भाजपचे अध्यक्ष-उपाध्यक्ष तर लाखनी काँग्रेसचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशी आघाडी करण्यात आली.लाखनीत उपाध्यक्षपदी धनु व्यास यांची वर्णीलाखनी : लाखनी नगर पंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा बहुमान काँग्रेसच्या कल्पना अरविंद भिवगडे यांना मिळाला. लाखनीत भिवगडे विरुद्ध भिवगडे अशी थेट लढत झाली. काँग्रेसच्या भिवगडे यांनी लाखनी विकास मंचच्या भिवगडे यांचा पराभव केला. कल्पना भिवगडे यांना ९ तर सुशिला भिवगडे यांना ८ मत मिळाले. भाजपाच्या ज्योती निखाडे यांना एकही मत मिळाले नाही. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनु व्यास यांनी भाजपाच्या महेश आकरे यांचा पराभव केला. व्यास यांना ९ तर आकरे यांना ८ मते मिळाले. निवडणूक प्रक्रिया पीठासिन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भुसंपादन अविनाश शिंदे, तहसिलदार डी.सी. बोंबर्डे, किशोर साखरकर, अभियंता जामुनकर यांच्या मार्गदर्शनात पार पाडली. नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी शहरातून विजयी रॅली काढली. या विजयी रॅलीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये पाटील, डॉ. विकास गभने, भाऊराव गिलोरकर, विनोद भुते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, धनंजय तिरपुडे, पप्पु गिऱ्हेपुंजे, दत्ता गिऱ्हेपुंजे, केशव बोळणे, मनोज टहिल्यानी, परवेज आकबानी, शिवदास गायधनी आदींसह काँगे्रस व राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)मोहाडीत अध्यक्ष, उपाध्यक्ष अविरोध मोहाडी : नगर पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या स्वाती महेश निमजे यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसचे सुनिल गिऱ्हेपुंजे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून एकच उमेदवारी नामांकन दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी अविरोध विजय झाल्याची घोषणा केली. याप्रसंगी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, तुमसरचे नगरपालिका गटनेते प्रमोद तितीरमारे, आशिष पातरे, हरीराम निमकर, जिवतू गायधने यांच्यासह काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादीच्या मनिषा गायधने हे उपस्थित होते. नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी शहरातून विजयी रॅली काढली. (शहर प्रतिनिधी)लाखांदुरात उपाध्यक्षपदी नरेश खरकाटेलाखांदूर : लाखांदूर नगर पंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकामध्ये भाजपच्या निलम हुमणे अध्यक्ष तर नरेश खरकाटे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. लाखांदूर नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अध्यक्षपद व उपाध्यक्षपद भाजपाकडे आले. भाजपाच्या निलम विलास हुमणे यांनी काँग्रेसच्या निलिमा सतीश टेंभुर्णे यांचा ११/६ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपद निवडणुकीमध्ये भाजपचे नरेश महादेव खरकाटे यांनी काँग्रेसचे रामचंद्र राऊत यांचा ११/६ मतांनी पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी. जोशी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही पार पडली. यावेळी भाजपाचे विनोद ठाकरे, रमेश मेहेंदळे, प्रल्हाद देशमुख, दिव्या राऊत, भारती दिवठे, वनिता मिसार, रिता गोटेफोडे, हरिष बगमारे, संगीता गुरनुले व भाजपाचे पदाधिकारी वामन बेदरे, नूतन कांबळे, प्रकाश राऊत, चंदु कुडेगावे, शैलेश मुल, भास्कर झोडे, राहुल कोटरंगे, शिवाजी देशकर, संजय अलोने, गोलू कुंभरे, भारत मेहंदळे उपस्थित होते. विजयाची घोषणेनंतर कार्यकर्त्यानी शहरातून विजयी रॅली काढली. (तालुका प्रतिनिधी)भाजप नगरसेवकांचे अपक्षाला मतदान४लाखनी नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचे ६ उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्योती निखाडे यांनी नामांकन दाखल केले होते. प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी भाजपाच्या ६ नगरसेवकांनी नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केलेले अपक्ष सुशिला भिवगडे यांना मतदान केले. भाजपच्या नगरसेवकांना भाजपाचे उमेदवार सोडून अपक्ष उमेदवाराला का? मतदान केले याविषयी लाखनी शहरात चर्चा रंगत आहेत. आमदार व खासदार हे भाजपचे आहेत, हे उल्लेखणीय.मोहाडीची कन्या लाखनीची नगराध्यक्ष ४मोहाडी येथील रहिवासी प्रगतशील शेतकरी केशवराव मेहर यांच्या कन्येला लाखनीचे पहिले नगराध्यक्ष बनण्याचा बहुमान मिळाला आहे. कल्पना मेहर यांचे दि.१४ जून १९९३ रोजी लाखनी येथील उद्योजक अरविंद भिवगडे यांच्याशी विवाह झाला. कल्पनाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे झाले. पदवीधर कल्पना भिवगडे यांना दोन मुली आहेत.विकासाला प्राधान्य देणार विकासाच्या नावावर निवडणूक लढविली. जनतेला विश्वास दिला. आता विश्वासाला तडा जावू देणार नाही. आरोग्य, पाणी, वीज, रस्ते या कामांना प्राधान्य देणार असून सर्वांगिण विकासाला अधिक महत्व देणार आहे.- नीलम हुमणे, नगराध्यक्ष लाखांदूर.प्रभागांचा कायापालट करु जनतेचे प्रमुख प्रश्न हे प्रभागामधील सोयी सुविधांचे असतात. रस्ते, नाल्या, वीज, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता व निरोगी पाणी जनतेला उपलब्ध करून देणार असून प्रत्येक प्रभागाकडे जातीने लक्ष देवून विकासासोबतच जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याला विशेष महत्व देणार आहे. - नरेश खरकाटे, उपाध्यक्ष लाखांदूर.
निमजे, हुमणे, भिवगडे बनल्या नगराध्यक्ष
By admin | Published: December 01, 2015 4:57 AM